गेल्या दोन वर्षांपासून कोविड 19 महामारीमुळे सर्वजण आपापल्या घरात कोंडून होतो. कामापासून ते करमणुकीपर्यंत सर्व काही घरातच व्हायचे. अशातच सिनेमा हॉलमध्ये सिनेमा बघायला जाता येत नव्हते आणि अशा परिस्थितीत ओटीटी प्लॅटफॉर्मची क्रेझ खूप वाढली गेली. अशातच Netflix आणि Amazon Prime Video सोबत, Disney + Hotstar च्या युजरमध्ये सुद्धा तुफान वाढ झाल्याचे दिसून आले. तर OTT प्लॅटफॉर्म Disney + Hotstar आपल्या युजर्ससाठी एक नवीन सबस्क्रिप्शन प्लॅन लवकरच लॉन्च करणार आहे.Disney + Hotstar च्या या नवीन प्लॅनची किंमत खूपच कमी असेल पण त्याला जाहिरातींचा सपोर्ट असणार आहे. हा प्लॅन प्रथम अमेरिकेत लाँच केला जाणार असून काही काळानंतर तो इतर देशांमध्ये जारी केला जाईल.
Disney + Hotstar जो नवीन सबस्क्रिप्शन प्लॅन आणत आहे, त्याची किंमत खूपच कमी असणार आहे. OTT प्लॅटफॉर्मने त्या प्लॅनची किंमत जाहीर केली नाही. परंतु निश्चितपणे सांगितले आहे की त्याची किंमत कंपनीच्या फ्री-अॅड वर्जनपेक्षा कमी असेल. तर Disney + Hotstar च्या फ्री-अॅड वर्जनची किंमत प्रति महिना 610 रुपये आहे.(Jio, Airtel आणि Vi चे अनलिमिडेट डेटासह कॉलिंगचे प्लॅनची किंमत 200 रुपयांहून कमी, जाणून घ्या अधिक)
सध्या, Disney+ Hotstar भारतात तीन सब्सक्रिप्शन प्लॅन ऑफर करते. सर्वात स्वस्त प्लॅन Rs 299 प्रति महिना आहे आणि Disney+ Hotstar चा सुपर प्लान Rs 899 आहे ज्यामध्ये तुम्हाला एका वर्षासाठी जाहिरात-मुक्त सामग्री आणि पूर्ण HD रिझोल्यूशनमध्ये सामग्री पाहण्याची संधी मिळते. Disney+ Hotstar च्या प्रीमियम प्लॅनची किंमत 1,499 रुपये आहे, ज्यामध्ये तुम्हाला एका वर्षासाठी जाहिरात-मुक्त सामग्री आणि 4K व्हिडिओ रिझोल्यूशनचा लाभ मिळतो.