Internet (Representative image) (Photo Credits: Pixabay)

भारतात लवकरचं ५जी इंटरनेट (5G Internet) सुरु होणार अशी चर्चा असतानाचं आता आपण भारतात वापरत असलेलं ४जी इंटरनेटमध्ये (4G Internet) भारताची पिछेहाट झाली आहे. कारण भारताच्या ४जी इंटरनेटचा वेग गेल्या काही दिवसात कमालीचा मंदावला आहे. मंदावलेला हा वेग कुठल्या एका कंपनीची अडचण नसुन एअरटेल (Airtel), जीओ (Jio), आयडिया (Idea) या सर्व कंपनीच्या इंटरनेच्या स्पीड कमी झाल्याचं चित्र आहे.  ब्रॉडब्रॅण्ड इंटरनेटचा (Broadband Internet) वेग देखील मंदावला आहे. आंतरराष्ट्रीय इंटरनेट (International Internet) देशांच्या पहिल्या 100 देशात देखील भारताचा समावेश होत नाही.  ग्लोबल स्पीड टेस्ट एजन्सी (Global Speed Test Agency) Ookla या कंपनीने जगभरात वापरण्यात येत असलेल्या इंटरनेट आणि इंटरनेट स्पीडबाबत एक हवाल जारी करण्यात आला आहे. या अहवालानुसार नोरवेने पहिला, युनायटेड रब इमिरेट्स दुसऱ्या तर कतार तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण भारत मात्र या यादीत 118 व्या क्रमांकावर आहे.

 

यापूर्वी भारत (India) ग्लोबल स्पीड टेस्ट एजन्सी (Global Speed Test Agency) Ookla च्या यादित पूर्वी ब्रॉडब्रॅण्ड इंटरनेटच्या स्पीडमध्ये (Broadband Internet Speed) 117 व्या क्रमांकावर होता पण आता या यादित भारताची आणखीच घसरण होवून भारत 118 व्या क्रमांकावर पोहचला आहे. तर मोबाइल इंटरनेट स्पीडबाबत (Mobile Internet Speed) भारत 78 व्या स्थानावरून  79 व्या स्थानावर आली आहे. (हे ही वाचा:- Samsung Galaxy Mobile On Flipkart: दिवाळी निमित्त फ्लिपकार्टची भन्नाट ऑफर, फक्त 549 रुपयात मिळवा सॅमसंग गॅलेक्सी अॅमरॉइड मोबाईल)

 

तरी ५जी इंटरनेट (5G Internet) सुरु होत असताना ४जी इंटरनेटच्या (4G Internet) स्पीडमध्ये कधी सुधारणा होणार असा प्रश्न भारतीय इंटरनेट (Indian Internet Speed) वापरकर्त्यांकडून विचारला जात आहे. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात भारतातील मोबाइल डाउनलोड स्पीड (Mobile Download Speed) चांगला झाला आहे.