Celebr8.world ने भारतात एक अनोखे अॅप लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे युजर्संना फेस्टिव सीजन नाविन्यपूर्ण पद्धतीने सेलिब्रेट करता येईल. या अॅपमध्ये वेगवेगळ्या सणांचे व्हिज्युअल अनुभव घेता येईल. भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू शिखर धवन याने आपल्या इंस्टाग्रामवर रिलमधून अॅप लॉन्च केले. या पोस्टमध्ये शिखर धवनने लिहिले की, "या वर्षी सर्वांसाठी सण वेगळ्या पद्धतीने साजरे होणार आहेत. परंतु, Celebr8 चा अॅप वापरुन तुम्ही एका वेगळ्या पद्धतीने सणाचा आनंद घेऊ शकाल अशी मला खात्री आहे."
सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात सणांसाठी नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना प्रत्यक्षात भेटणे शक्य नाही. त्यामुळे ऑनलाईन मिटींग्सकडे लोकांनचा कल वाढला आहे. ही बाब लक्षात घेऊन सेलिब्रेटने अनोखा डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे. ज्याच्या माध्यमातून सोशल डिस्टसिंग पाळत तुम्ही तुमच्या मित्रमंडळींसोबत सणांचा आनंद घेऊ शकाल.
पहा पोस्ट:
दसरा, दिवाळी या सणासुदीच्या काळात हा अॅप लॉन्च करण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. कोविड-19 च्या काळात सणांच्या सेलिब्रेशनवर घातलेल्या निर्बंधांमुळे आम्ही हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. ज्यामुळे सोशल डिस्टसिंगचे भान ठेवत पर्यावरणस्नेही सण साजरे करता येतील. यापुढे सर्वच सणांसाठीच आमचे अॅप सेलिब्रेशनचे माध्यम ठरेल, असा आमचा मानस आहे, अशी माहिती Celebr8 ची को-फाऊंडर निकीता सिंग गौतम यांनी दिली.
दसऱ्याच्या संध्याकाळी Celebr8 अॅपवर 3D Raavan चे दहन होणार आहे. हे रावण दहन पाहण्यासाठी लोकांना एकत्र येऊन गर्दी करण्याची काही गरज नाही. रावण दहन विधी 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजता AR environment घरबसल्या बघता येईल. त्याचप्रमाणे हा अनुभव नातेवाईक आणि मित्रमंडळींसोबतही सोशल मीडियावर शेअर करता येईल.
अॅप डाऊन करण्यासाठी लिंक्स:
https://play.google.com/store/apps/details?id=com.celebrate.celebrateapp
https://apps.apple.com/in/app/celebr8-world/id1534994264
अशाचप्रकारे दिवाळीचे सेलिब्रेशनही तुम्ही व्हर्च्युअली करु शकाल. Celebr8 अॅपच्या माध्यमातून फुलबाजी, रॉकेट्स, पाऊस, भुईचक्र यांसारख्या फटाक्यांचा व्हर्च्युअल आनंद तुम्ही घेऊ शकाल. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या रांगोळ्या, दिवे आणि कंदील सुद्धा तुम्हाला अनुभवता येतील. दिवाळी साजरी करण्याचा हा सर्वात सुरक्षित पर्याय असेल.