BSNL च्या प्रीपेड सिमवर 20 एप्रिल पर्यंत Without Recharge मिळणार कॉलिंग सेवा; केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांची माहिती
BSNL (Photo Credit: Livemint)

सरकारी टेलिकम्युनिकेशन कंपनी भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL तर्फे 20 एप्रिल पर्यंत आपल्या प्रीपेड सिमकार्डवरील सर्व सेवा या रिचार्ज न करता सुद्धा सुरु ठेवण्यात येतील अशी घोषणा करण्यात आली आहे. लॉक डाऊन (Lock Down) काळात रिचार्ज करणे शक्य न झाल्यास फोनची सेवा बंद केली तर गरीब आणि गरजूंना फटका बसू शकतो त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे यानुसार, आज पासून प्रतिदिवशी प्रत्येक सीमवर कॉलिंग पुरता 10 रुपयांचा रिचार्ज केला जाईल. याबाबत केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांनी अधिकृत माहिती दिली आहे. रिलायन्स जिओची शानदार ऑफर! 21 रुपयांच्या रिचार्जमध्ये दुप्पट 4G डेटासह कॉलिंगचा फायदा

सद्य परिस्थिती पाहता, लॉक डाऊन असल्याने अनेक सेवा सुविधा बंद आहेत त्यामुळे जर का कोण्या व्यक्तीला आपल्या फोनचा रिचार्ज करायचा असेल तर प्रत्यक्ष तर हे शक्य होणारच नाही मात्र ऑनलाईन रिचार्जच्या बाबत सुद्धा अडचणी येऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर TRAI ने सर्व टेलिकॉम ऑपरेटर्सना, सर्व प्रीपेड ग्राहक अखंडित सेवांचा वापर करू शकतील यासाठी रिचार्जची वैधता कालावधी वाढविणे आवश्यक आहे.असे सुचवले होते. यानुसार BSNL तर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात 1 एप्रिल पासून वीज दरात मोठी कपात; शेती, व्यावसायिक व घरगुती ग्राहकांना दिलासा

ANI ट्विट

दरम्यान , कोरोना व्हायरस सध्या भारतात वेगाने पसरत आहे. आतापर्यंत 1000 हुन अधिकांना या व्हायरसची लागण झाली आहे तर 30 हुन अधिकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचा लॉक डाऊन जारी केला आहे. त्यामुळे सर्व अत्यावश्यक सेवा वगळून अन्य दुकाने, ऑफिसेस बंद करण्यात आली आहे.