रिलायन्स जिओचे (Reliance Jio 4G Simcard) 4जी सिमकार्ड आल्यापासून इतर सर्वच दूरसंचार कंपन्यांचे (Telecommunication Company) मोठे नुकसान झालेले पाहायला मिळत होते .हा तोटा कमी करण्यासाठी सर्वच कंपन्या वेगवेगळी हटके शक्कल लढवताना दिसत होत्या पण सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल (BSNL) ला याचा सर्वात मोठा फटका बसला होता. पण आता आपल्या नव्या कोऱ्या प्लॅन सोबत बीएसएनएल परत स्पर्धेत उतरण्याची तयारी करत आहे.
बीएनएलच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार या टेलीकॉम कंपनीतर्फे अलीकडे 99 रुपयांचे पोस्टपेड प्लॅन्स सुरु करण्यात आले आहेत. सध्या ग्राहकांसाठी 99 रुपयांपासून ते 1525 रुपयांपर्यंतचे पोस्टपेड प्लॅन उपलब्ध आहेत. बीएसएनएल कंपनीच्या या नव्या प्लॅन्सचे फायदे आणि अटी जाणून घ्या..
असे आहेत बीएसएनएलचे नवे पोस्टपेड प्लॅन्स
99 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन- ग्राहकांना या प्लॅनच्या अंतर्गत 500 एमबी डेटा देण्यात येईल. यासोबतच 50 आउटगोइंग कॉल्स व 100 मॅसेज मोफत करता येतील. हा प्लॅन लागू करण्यासाठी ग्राहकांना सुरवातीला 500 रुपयांचे डिपॉझिट भरणे बंधनकारक असणार आहे. तसेच या प्लॅन अंतगत आयएसडी व एसटीडी सुविधांचा लाभ घ्याचा असल्यास 2000 रुपयांची सुरक्षा डिपॉझिट रक्कम भरावी लागेल असे प्लॅन मध्ये नमूद करण्यात आले आहे.
149 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅन- 100 कॉल्स, 100 एसएमएस मोफत व ,500 एमबी डेटा
225 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅन- 180 कॉल्स, 100 एसएमएस मोफत व 3000 एमबी डेटा
325 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅन- 270 कॉल्स, 100 एसएमएस मोफत व 7000 एमबी डेटा
399 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅन- अनलिमिटेड कॉलिंग, 100 एसएमएस, 30 जीबी डेटा
याचप्रमाणे 525 , 725 , 799 , 1125 आणि 1525 रुपयांचे पोस्टपेड प्लॅन बीएसएनएलकडून ग्राहकांसाठी खुले करण्यात आले असून, याची अधिक माहिती बीएसएनएलच्या संकेतस्थळावर उपलब्ध होऊ शकते.