Airtel Prepaid Recharge: 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये खास बदलासह 'एअरटेल'ने सादर केला 129 रुपयांचा नवा प्लॅन; पहा काय आहेत सुविधा
Airtel (Photo Credits: File Image)

एअरटेलने (Airtel) आपल्या पोस्टपेड प्लॅनमध्ये मोठा बदल केला आहे. त्याचबरोबर आता युजर्ससाठी एअरटेलने नवा प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. यात पोस्टपेड प्लॅनमध्ये मिळत असलेल्या सुविधा या नव्या प्लॅनमध्ये मिळणार आहेत. एअरटेलचा नवा प्लॅन हा प्रीपेड युजर्सला आकर्षिक करण्यासाठी सादर करण्यात आला आहे. (Airtel च्या प्रीपेड ग्राहकांनाही मिळणार Amazon Prime चे फ्री सब्सक्रिप्शन)

129 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

एअरटेलने 129 रुपयांचा नवा प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. युजर्सला माफक दरात सेवेचा लाभ मिळावा याचा विचार करुन एअरटेलने हा नवा प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनअंतर्गत युजर्सला 2 जीबी डेटा 28 दिवासांसाठी दिला जाणार आहे. यात युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगसह रोज 100 एसएमएस ची सुविधा मिळणार आहे. या व्यक्तिरिक्त या प्लॅनमध्ये एअरटेल टीव्ही आणि विंक म्युझिकचे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल. एअरटेल टीव्ही वर तुम्हाला 350 लाईट टीव्ही चॅनल आणि 10 हजारहून अधिक सिनेमे आणि शोज पाहू शकता.

249 रुपयांचा प्लॅन

249 रुपयांचा प्लॅन तर सर्वात हटके आहे.विशेष म्हणजे या प्लनअंतर्गत 4 लाख रुपयांचा एचडीएफसी लाईफ इन्शोरन्स मिळेल. याशिवाय यात युजर्सला दररोज 2 जीबी डेटा सह अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस मिळतील. या प्लॅनची व्हॅलिटीडी 28 दिवसांची आहे. या प्लॅनअंतर्गत एअरटेल टीव्ही, विंक म्युझिकचे सब्सक्रिप्शन मिळेल. त्याचबरोबर नवा 4 जी फोन खरेदी केल्यास या प्लॅनअंतर्गत 2000 रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे. तसंच नॉरटोन मोबाईल सिक्युरिटीचे वर्षभराचे सब्सक्रिप्शन देखील मिळत आहे.