काही वर्षांपूर्वी टचस्क्रीन स्मार्टफोन बाजारात यायच्या आधी Blackberry स्मार्टफोन्सने भारतात धुमाकूळ घातला होता. याची स्क्रीन बेसिक फोनच्या तुलनेत थोडी मोठी असल्याकारणाने या फोन्सची अनेकांना क्रेझ होती. पण हळूहळू काळ बदलत गेला आणि या ब्लॅकबेरीची जागा टचस्क्रीन आणि आयफोन्सने घेतली. बदलत्या काळानुसार लोकांचे राहणीमान देखील उंचावत गेले. मात्र त्यामुळे ब्लॅकबेरीची क्रेझ कमी झाली. त्यामुळे आपल्या फोन्समध्ये काही खास बदल करुन BlackBerry पुन्हा भारतीय बाजारात पुनरागमन करत आहे. या वर्षाअखेरीस हा स्मार्टफोन लाँच होण्याची शक्यता आहे. चीनी मिडिया रिपोर्टनुसार, या वर्षाच्या शेवटपर्यंत हा स्मार्टफोन लाँच होऊ शकतो.
चीनी मिडिया IT Home रिपोर्टनुसार, कंपनीचे सीईओ पीटर फ्रेंकलिन (Peter Franklin) ने कंफर्म केले आहे की नवीन ब्लॅकबेरी फोन या वर्षाच्या शेवटी QWERTY कीबोर्डसह लाँच केले जाईल.
हेदेखील वाचा- Reliance Jio च्या 155 रुपयांच्या रिचार्ज मध्ये युजर्सला मिळणार 1GB डेटासह अनलिमिटेड कॉलिंग
मिळालेल्या रिपोर्टनुसार, हा ब्लॅकबेरी 5G स्मार्टफोन आशियाई बाजारात सुद्धा लाँच केला जाऊ शकतो. या फोनबाबत किंवा याच्या फिचर्सबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
तसेच ब्लॅकबेरीचा हा स्मार्टफोन कधी लाँच होऊ शकतो याच्या तारखेबाबत कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही. भारतात ब्लॅकबेरीने Optiemus Infracom सोबत भागीदारी केल्यानंतर मागील वर्षी आपला स्मार्टफोन लाँच केला होता. तसेच ब्लॅकबेरीच्या या नव्या 5G स्मार्टफोनचे डिझाईन 2018 मध्ये लाँच झालेल्या BlackBerry Key2 सारखे असेल. तसेच हा फोन अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमवर चालू शकतो.
काही वर्षांपूर्वी भारतीय बाजारात ब्लॅकबेरी आणि नोकियाची क्रेझ होती. मात्र कालांतराने मोबाईल जगतात नवनवीन बदल झाल्यानंतर यांची जागा स्मार्टफोन्स, आयफोन्सने घेतली. त्यात टचस्क्रीन स्मार्टफोन्सचे फॅड वाढले.