layoff Pixabay

आणखी एका दिग्गज कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर नोकरकपात ही (Layoffs) करण्यात येणार आहे. जगातील सर्वात मोठ्या पार्सल डिलिव्हरी (Parcel Delivery Company) कंपनी युपीएस (UPS) हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे.   युनायटेड पार्सल सर्व्हिस (UPS) ही जगातील सर्वात मोठी पार्सल वितरण कंपनी 12,000 कामगारांना कामावरून कमी करणार  आहे.  12000 कर्मचाऱ्यांना कमी करण्याच्या बातमीमुळे सर्वच क्षेत्रात खळबळ माजली आहे. गेल्या काही महिन्यात नाईकी (Nike), गुगल  (Google) सारख्या मोठ्या कंपन्यांनीही नोकरकपात केली आहे. (हेही वाचा - Microsoft Lay Offs: मायक्रोसॉफ्टमध्ये होणार नोकर कपात; ऍक्टिव्हिजन ब्लिझार्डसह गेमिंग विभागातील 1,900 लोकांना कामावरून काढले जाणार)

पाहा पोस्ट -

दरम्यान, नोकरकपातीच्या या बातमीनंतर सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये UPS च्या शेअर्समध्ये 6.3 टक्क्यांची मोठी घसरण झाली.  युपीएल कंपनीने आता खर्चात 1 अब्ज डॉलर कपात करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. UPS ला 2024 च्या दुसऱ्या सहामाहीपर्यंत चांगल्या व्यावसायिक परिस्थितीची अपेक्षा नाही. कंपनीने आता खर्चात 1 अब्ज डॉलर कपात करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. UPS ला 2024 च्या दुसऱ्या सहामाहीपर्यंत चांगल्या व्यावसायिक परिस्थितीची अपेक्षा नाही.

टीमस्टर्स युनियनसोबतच्या नवीन करारामुळे त्याच्या मजुरीचा खर्च वाढत आहे. याशिवाय कंपनीच्या सरासरी ऑर्डर्सही कमी होत आहेत. कंपनीचं ऑपरेटिंग मार्जिन पहिल्या तिमाहीत सर्वात कमी असण्याची अपेक्षा आहे. UPS चा आंतरराष्ट्रीय हवाई-आधारित विभाग आणि ट्रक व्यवसाय चौथ्या तिमाहीत अनुक्रमे 6.9 टक्के आणि 7.3 टक्के घसरला.