Mumbai News: कंपनीवर 3,000 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप करणाऱ्या सीएला अटक
Cyber Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Mumbai News: सायबर इन्व्हेस्टिगेशन युनिटने एका चार्टर्ड अकाउंटंटला अटक केले आहे. आरोपीने पुण्यातील विंडसन प्रोजेक्सट प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीची बदनामी करण्याच्या उद्देशाने खोटे डेटा घेऊन फसवणूक करत असल्याची माहिती समोर आली आहे. बदनामी प्रकरणी विंडसन प्रोजेक्ट्सचे भागीदार शैलेंद्र राठी यांनी सायबर सेलकडे तक्रार दाखल केली.  मोहित जैन (वय वर्ष 30) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2023, 12 डिसेंबर रोजी तत्कार नोंदवण्यात आला. शैलेंद्र राठी यांनी पोलिसांत तक्रार केली की, की @satya_karmaa हँडल असलेल्या X  (पूर्वीचे ट्वीटर) वापरकर्त्याने 7 डिसेंबर रोजी एक आक्षेपार्ह ट्विट पोस्ट केले आणि विंडसनचा ₹3000 कोटींच्या घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप केला. या ट्विटमध्ये असा दावा करण्यात आला आहे की एक प्रमुख व्यावसायिक कंपनी देखील या कथित घोटाळ्याचा भाग होती आणि पैसे विंडसनच्या बँक खात्यात जमा करायचे होते. राठी यांनी पुरावा म्हणून एक लिंक दिली पण ती उघडली नाही आणि काळानंतर  X (पूर्वीचे ट्वीटर) खाते @satya_karmaa देखील डिलीट करण्यात आले होते.

या तक्रारानुसार पोलिसांनी एफआयआर नोंदवला. त्यानंतर हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. पोलिसांच्या तपासणी आले की, कंपनीच्या बॅंत खात्यातील डेटाचे उल्लंघन केले. पोलिसांनी आरोपी मोहित जैन याला राहत्या घरातून अंधेरी येथून 27 जानेवारी रोजी अटक केले.