WhatsApp, Telegram, Signal, iMessage यांना एकत्रित करणारा नवा Beeper App लॉन्च; जाणून घ्या वैशिष्ट्यं
Beeper (Photo Credits: Beeper)

सर्व मेसेजिंग अॅपला एकत्र आणणारे नवे अॅप Beeper लॉन्च झाले आहे. Pebble स्मार्टवॉच कंपनीचे फाऊंडर Eric Migicovsky यांनी हा अॅप डेव्हलअप केला आहे. व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, सिग्नल,  मेसेंजर, स्काईप, Discord, IRC. Slack, SMS, Twitter DMs, Apple iMessage आणि Google Hangouts यांसारख्या 15 मोठ्या मेसेजिंग अॅपचे सेंटर पाईंट म्हणून बीपर काम करु शकतो. या अॅपमधूनच तुम्ही कोणत्याही अॅप मेसेजला रिप्लाय करु शकता. हा अॅप वापरण्यासाठी तुम्हाला महिन्याला 10 डॉलर म्हणजे 730 रुपये मोजावे लागतील. या अॅपची अजून एक खासियत म्हणजे तुम्ही अॅनरॉईड मोबाईलवर सुद्धा iMessager चालवू शकता.

Beeper (Photo Credits: Beeper)

Beeper अॅपचे पूर्वीचे नाव 'NovaChat' होते. हा अॅप अॅनरॉईड, विंडोज, मॅक, लिनक्स आणि आयओएस या सर्व प्लॅटफॉर्म्सवर चालतो. व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, सिग्नल आणि इतर अॅप्लसा कन्टेट करण्यासाठी बीपर अॅप मॅक्ट्रीसचा वापर करतो. मॅट्रीक्स हे एक ओपन सोर्स मेसेजिंग प्रोटोकॉल असून मेसेजिंग सर्व्हिसेसच्या मध्ये कनेक्शन ब्रिजचे काम करतो.

Beeper Tweet:

imessenger ला अॅनरॉईड आणि विंडोजवर चालवणे थोडेसे कठीण होते आणि यासाठी कंपनीने दोन वेगवेगळे पर्याय शोधून काढले. यातील पहिला पर्याय म्हणजे सर्व पेड युजर्संना बीपर अॅप इंस्टाल असलेला jailbroken iPhone  देण्यात येईल आणि तो आयफोन ब्रिज म्हणून काम करेल. जर युजरकडे मॅक मशिन असेल तर युजर बीपरचा मॅक अॅप आपल्या मशिनवर इंस्टॉल करु शकतील. हा नवा अॅप खूप उपयुक्त ठरु शकतो. परंतु, मेसेजेसच्या इन्क्रिप्शनबद्दल या अॅपच्या अधिकृत वेबसाईटवर कोणतीही माहिती पुरवलेली नाही. बीपर अॅप हा अद्याप सर्वांसाठी उपलब्ध झालेला नाही. या अॅपचे इंन्व्हीटेशन घेण्यासाठी युजर्संना त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जावून एक फॉर्म भरावा लागेल.