Twitter Audio Video Call Feature: प्रतिक्षा संपली! आता ट्विटरवरूनही करता येणार ऑडिओ-व्हिडिओ कॉल; 'असा' करा वापर
Twitter Audio Video Call Feature (PC - X/@howfxr)

Twitter Audio Video Call Feature: तुम्ही मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Twitter म्हणजेच X वापरत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. खरं तर, जेव्हापासून एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरची जबाबदारी स्वीकारली आहे, तेव्हापासून त्यांनी एक्सवर विविध बदल केले आहेत. वापरकर्त्यांना ट्विटरवर अनेक नवीन वैशिष्ट्ये मिळाली आहेत. आता एलॉन मस्क यांनी आता ट्विटरवरील युजर्सना आत्तापर्यंतचे सर्वात मोठे फीचर दिले आहे. आता तुम्ही ट्विटरवरूनही ऑडिओ-व्हिडिओ कॉल (Twitter Audio Video Call) करू शकाल.

काही महिन्यांपूर्वी ट्विटरने सांगितले होते की, ते ऑडिओ व्हिडिओ कॉल फीचरवर काम करत आहे. हे फीचर आल्यानंतर तुम्ही WhatsApp, Instagram आणि Facebook प्रमाणे Twitter वरून ऑडिओ व्हिडिओ कॉल देखील करू शकता. X च्या या नवीन फीचरचा युजर्संना नक्की फायदा होईल. (हेही वाचा - Instagram Message Feature: इन्स्टाग्रामवर 'या' फीचरमुळं चुकिचा संदेश पाठवल्याची चुक सुधारता येणार)

ट्विटरवर गेल्या वर्षभरात अनेक मोठे बदल झाले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला, ट्विटरद्वारे परवडणाऱ्या व्हेरिफाईड योजना सादर करण्यात आल्या होत्या. ज्या वापरकर्त्यांना ब्लू टिक मिळवायचा आहे ते या प्लॅनच्या मदतीने आपले खाते व्हेरिफाईड करू शकतात. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये युजर्ससाठी अनेक फीचर्सही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. (हेही वाचा - -Instagram New Features: इन्स्टाग्राम युजर्सना मिळणार खास फिचर, स्टोरीवर प्रोफाइल शेअर करण्याचा मिळणार पर्याय)

ट्विटर वापरकर्त्यांना व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलची सुविधा -

इलॉन मस्क ट्विटरला एक परिपूर्ण सोशल मीडिया अॅप बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी ते हळूहळू X वर नवीन अपडेट आणत आहेत. आता त्यांनी ट्विटर वापरकर्त्यांना व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलची सुविधा दिली आहे. X वर खालील पद्धतीने तुम्ही ऑडिओ व्हिडिओ कॉल फीचर वापरू शकता.

अशा पद्धतीने वापरा ऑडिओ-व्हिडिओ कॉल फिचर -

  • सर्व प्रथम X च्या सेटिंग्ज पर्यायावर जा.
  • आता तुम्हाला Privacy and Safety या पर्यायावर जावे लागेल.
  • आता तुम्हाला येथे डायरेक्ट मेसेजचा पर्याय मिळेल.
  • तुम्हाला डायरेक्ट मेसेजवर ऑडिओ व्हिडिओ कॉलचा पर्याय मिळेल, तो सक्षम करा.

सध्या ट्विटरवर ऑडिओ व्हिडिओ कॉलचा पर्याय फक्त प्राइम सदस्यांसाठी आहे. मात्र प्रत्येकाला कॉल रिसिव्ह करण्याची सुविधा असेल.