Apple Jobs: ॲपलची मोठी योजना, कंपनी भारतातील 5 लाख लोकांना देणार रोजगार
Apple (Apple / Twitter)

Apple Jobs: जगातील आघाडीची स्मार्टफोन निर्माता कंपनी ॲपल भारतात लाखो नोकऱ्या उपलब्ध करून देणार आहे. आयफोन बनवणारी कंपनी येत्या 3 वर्षांत भारतात सुमारे 5 लाख नोकऱ्या उपलब्ध करून देणार आहे. ॲपल विक्रेत्यांमार्फत या नोकऱ्या दिल्या जातील. सध्या ॲपलचे विक्रेते आणि पुरवठादारांनी भारतात दीड लाख लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. ॲपलसाठी दोन प्लांट चालवणारी टाटा इलेक्ट्रॉनिक्स सर्वाधिक रोजगार निर्माण करते.

 एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, "ॲपल भारतात भरतीला गती देत ​​आहे. आधीच्या अंदाजानुसार, पुढील तीन वर्षांत ते विक्रेते आणि घटक पुरवठादारांद्वारे पाच लाख लोकांना रोजगार देणार आहे."
ॲपलला भारतात आपले उत्पादन 5 पट वाढवायचे आहे ॲपलने भारतात आपले उत्पादन जवळपास 5 पटीने वाढवण्याची योजना आखली आहे. कंपनीला भारतातील उत्पादन पुढील 5 वर्षांत सुमारे $40 अब्ज (रु. 3.32 लाख कोटी) पर्यंत नेण्याची इच्छा आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी ॲपलला मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण कराव्या लागतील.