Apple Logo. (Photo Credits: IANS)

जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन बनवणारी कंपनी Apple ने या वर्षीच्या आपल्या सर्वात मोठ्या इव्हेंटची तयारी करायला सुरुवात केली आहे. दरवर्षी  प्रमाणे या इव्हेंटमध्ये काही धमाकेदार होण्याची शक्यता आहे. प्रीमियम स्मार्टफोन निर्माता कंपनी Apple Inc ने 10 सप्टेंबर रोजी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कॅलिफोर्नियामधील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये हा खास कार्यक्रम होणार आहे. अशी आशा आहे की, या कार्यक्रमात आयफोनचे तीन नवीन मॉडेल (New-Generation iPhone) सादर केले जातील.

कंपनीने या कार्यक्रमाचे मीडिया इंव्हीटेशन पाठवायला सुरुवात केली आहे. हा कार्यक्रम 10 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता थिएटरमध्ये सुरू होईल. रात्री 10.30 वाजता Apple चा हा खास कार्यक्रम भारतात थेट पाहता येईल. अशी अपेक्षा आहे की या कार्यक्रमात आयफोनची 11 ची तीन नवीन मॉडेल्स बाजारात आणली जातील. माध्यमांमध्ये लीक झालेल्या माहितीनुसार Apple या विशेष कार्यक्रमामध्ये आयफोन 11 (iPhone 11), आयफोन 11 प्रो (iPhone 11 Pro) आणि आयफोन 11 प्रो मॅक्स (iPhone 11 Max) सादर करेल. (हेही वाचा: घरबसल्या तब्बल 7 कोटी रुपये कमावण्याची सूवर्णसंधी; Apple कंपनीची नवी ऑफर)

या कार्यक्रमात आयफोनच्या तीन मॉडेल्स व्यतिरिक्त Apple कडून नवीन Apple Watch आणि Apple TV ची नवीनतम आवृत्ती बाजारात आणण्याची अपेक्षा आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लॉन्च होणाऱ्या या तीन स्मार्टफोनमध्ये दोन रीअर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, आयफोन 11 मालिकेत 6.1 इंचाचा मोठा डिस्प्ले देखील दिला जाऊ शकतो. सध्या आयफोन एक्सएसमध्ये 5.8 इंचाचा डिस्प्ले आहे.