Amazon Small Business Day 2020: 27 जून रोजी सुरु होणार अ‍ॅमेझॉन ‘स्मॉल बिझनेस डे’; छोटे व्यावसायिक, कारागीर यांच्याकडून खरेदी करण्याची सुवर्णसंधी
प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: BussinessSuiteOnline.com)

जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन (Amazon), 27 जून रोजी स्मॉल बिझनेस डे 2020 (Amazon Small Business Day 2020) साजरा करत आहे. या उपक्रमाचे यंदाचे तिसरे वर्षे असणार आहे. या कार्यक्रमात कोविड-19 (Coronavirus) मुळे प्रभावित झालेले व्यावसायिक, स्टार्टअप्स, कारागीर, विणकर तसेच इतर लघु उद्योजक भाग घेतील. या उपक्रमात खरेदीदारांना छोटे व्यवसाय आणि लघु उद्योजकांद्वारे ऑफर केलेली अनोखी आणि दुर्मिळ उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तसेच ग्राहकांसाठी ही उत्तम पर्वणी असेल, जेणेकरून ते छोटे व्यावसायिक, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला पाठिंबा देऊ शकतील किंवा मदत करू शकतील.

लोकल शॉप्स, अ‍ॅमेझॉन लॉन्चपॅड, अ‍ॅमेझॉन सहेली आणि अ‍ॅमेझॉन कारागीर या अ‍ॅमेझॉनच्या विविध कार्यक्रमांतर्गत ग्राहक नवीन आणि युनिक गोष्टींची खरेदी करू शकतील.

या गोष्टी उपलब्ध असतील –

घरातील अत्यावश्यक वस्तू, फॅशनबाबतीत अनेक गोष्टी, विणकाम, हस्तकला, पादत्राणे, सजावटीच्या गोष्टी, हँगिंग्ज, शिल्पकला, स्वयंपाकघरातील गोष्टी, क्रीडाविषयक आवश्यक वस्तू. यामध्येही इंडिया बाजार, बजेट बाय आणि बेस्टसेलर्स सारख्या अनेक थीमखाली ग्राहक खरेदी करतील.

याबाबत बोलताना, अ‍ॅमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष (सेलर सर्व्हिसेस) गोपाल पिल्लई म्हणाले, 'एसएमबी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे जे, उत्पादनांची सर्वात अनोखी निवड करतात. कोविड-19 महामारीच्या आधीपर्यंत हा व्यवसायाची वाद तेजीत होती. आता अशा सर्व लोकांना समर्थन देण्यास आणि त्यांच्या उत्पादनांसाठी ग्राहकांची मागणी निर्माण करण्यात मदत करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत.’ तर अशाप्रकारे या दिवशी ग्राहक अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून लहान व्यावसायिकांकडून गोष्टी खरेदी करू शकणार आहेत. (हेही वाचा: फ्लिपकार्टवर 23 ते 27 जूनदरम्यान चालणार महासेल; स्मार्टफोन्सवर मिळणार घसघशीत सूट, See Offers)

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये स्मॉल बिझिनेस डेच्या दुसर्‍या वर्षी 1200 हून अधिक विक्रेत्यांनी एकाच दिवसात सर्वाधिक विक्री केली होती. यानंतर अ‍ॅमेझॉनच्या फायद्यात 2.5 पट वाढ झाली होती. यासह 'अ‍ॅमेझॉन सहेली' कार्यक्रमाचा एक भाग म्हणून विक्री करणार्‍या महिला उद्योजकांची वाढ 1.7 पट वाढली होती.