Amazon Prime सब्सक्रिप्शन अर्ध्या किंमतीत खरेदी करण्याची संधी, असा मिळेल 50 टक्के कॅशबॅक
Amazon Prime (Photo Credits-Twitter)

जर तुम्ही व्हिडिओ स्ट्रिमिंग सर्विस अॅमेझॉन प्राइमचे  (Amazon Prime) वार्षिक सब्सक्रिप्शन किंवा 3 महिन्यांची मेंबरशिप घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. कारण कंपनीकडून युजर्सला 50 टक्के कॅशबॅक ऑफर करत आहे. याच बद्दल आम्ही तुम्हाला अधिक माहिती देणार आहोत. कंपनीची ही ऑफर तरुणांसाठी आहे. म्हणजेच Amazon Prime Youth Offer असे त्याचे नाव आहे. ही ऑफर 18 वर्ष ते 24 वर्षादरम्यानच्या तरुणांसाठी आहे. खरंतर अॅमेझॉन प्राइमच्या वार्षिक प्लॅनची किंमत 999 रुपये आहे. मात्र 50 टक्के म्हणजेच 499 रुपयांत उपलब्ध होणार आहे. तर 3 महिन्यांची मेंबरशिप ची किंमत 329 रुपये मात्र ती 50 टक्के कॅशबॅक नंतर 165 रुपये मोजावे लागणार आहेत.

50 टक्के कॅशबॅकच्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रथम सब्सक्रिप्शनचे संपूर्ण पैसे भरावे लागणार आहेत. त्यानंतर Age वेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी SMS किंवा Email येईल. तर वयाचे वेरिफिकेश करण्यासाठी काही कागदपत्र सुद्धा दाखवावी लागणार आहेत. वयाचे वेरिफिकेशन झाल्यानंतर अॅमेझॉन पे अकाउंटमध्ये 50 टक्के रक्कम क्रेडिट केली जाणार आहे.(Nokia ने नव्या स्मार्टफोन्ससह लाँच केले Lite Earbuds, जाणून घ्या याची खास वैशिष्ट्ये आणि किंमत)

अॅमेझॉनचे असे म्हणणे आहे की, वयाचे वेरिफिकेशन करण्यासाठी 24 तास लागू शकतात. 50 टक्के कॅशबॅकचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 30 दिवसांचा फ्री ट्रायल सुद्धा दिला जाणार आहे. मेंबरशिपसह अॅमेझॉन फ्री आणि फास्ट डिलिव्हरी व्यतिरिक्त अॅमेझॉनवरील एक्सक्लूसिव्ह डिल्स आणि अॅड-फ्री म्युझिकची सुद्धा लाभ घेता येणार आहे.