Amazon (PCc - Pixabay)

बहुप्रतीक्षित अॅमेझॉन प्राइम डे (Amazon Prime Day Sale) सेलची तारीख जाहीर करण्यात आली आहे, हा सेल केवळ अॅमेझॉन प्राइम सदस्यांसाठी सुरू होईल. हा अॅमेझॉनचा सर्वात मोठा वार्षिक सेल आहे जो या वर्षी 23 जुलै आणि 24 जुलै रोजी होणार आहे. या 6 व्या अॅमेझॉन प्राइम डे सेलमध्ये प्राइम सदस्यांना उत्पादनांच्या विविध श्रेणींवर सर्वोत्तम डील मिळतील. याचा अर्थ तुम्हाला स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही किंवा होम अप्लायन्स खरेदी करायचा असला तर हा सेल एक उत्तम संधी ठरू शकणार आहे.

सेल 22 जुलैच्या मध्यरात्री म्हणजेच 23 जुलैला सुरू होईल आणि 24 जुलै रोजी रात्री 11:59 पर्यंत सुरू राहील. सेल दरम्यान खरेदी करताना, प्राइम सदस्यांनी आयसीआयसीआय बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्ड, एसबी आय क्रेडिट कार्ड किंवा ईएमआय व्यवहार वापरल्यास ते 10 टक्के बचत करू शकतील.

सेल दरम्यान, ग्राहकांना Xiaomi, OnePlus, Samsung आणि Apple यासह इतर ब्रँडेड उत्पादनांवर आकर्षक डील मिळतील. याशिवाय 23 आणि 24 जुलै रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत वॉव डील देखील होतील. यामध्ये तुम्ही स्मार्टफोन्सवर 7,000 रुपयांच्या एक्सचेंज ऑफरसह स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीजवर 40 टक्के सूट मिळवू शकता. लॅपटॉप आणि हेडफोनवर 75 टक्के सूट, टीव्ही आणि इतर उपकरणांवर 50 टक्के पर्यंत सूट मिळणार आहे. तसेच तुम्ही Amazon Echo, Fire TV आणि Kindle डिव्हाइसवर 55% पर्यंत सूट मिळवू शकता. (हेही वाचा: Mobile Recharge : मोबाईल रिचार्जच्या दरात मोठे बदल, आता फक्त 109 रुपयांत 30 दिवसांची वैधता)

या सेलमध्ये 400 हून अधिक भारतीय आणि जागतिक ब्रँडची 30,000 हून अधिक उत्पादने लाँच केली जातील. दरम्यान, Amazon Prime च्या वार्षिक प्लॅनसाठी तुम्हाला 1499 रुपये खर्च करावे लागतील, तर एका महिन्याच्या प्लानसाठी तुम्हाला 179 रुपये खर्च करावे लागतील. तुमचे वय 18 ते 24 वर्षांच्या दरम्यान असल्यास, कंपनी सदस्यत्वावर पूर्ण 50% सूट देईल, होय तुम्हाला केवळ अर्ध्या किमतीत मेंबरशिप मिळेल. की ही कंपनीची युवा ऑफर आहे.