Amazon Deal Of The Day: ड्युअल रोटिंग स्क्रीन स्मार्टफोन LG Wing वर मिळतोय मोठा डिस्काउंट; ऑफर्स फक्त आजच्या दिवस मर्यादित
एलजी/LG Phone (Photo Credits: Twitter)

Amazon Deal Of The Day: ड्युअल स्क्रीन स्मार्टफोन LG खरेदीवर मोठ्या सवलतीची ऑफर देण्यात येत आहेत. ई-कॉमर्स साइट अॅमेझॉनवर फोन विक्रीसाठी सूचीबद्ध करण्यात आला आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे. जी आज रात्री 12 वाजेपर्यंत लागू असेल. अॅमेझॉनवर ग्राहक एलजी विंग स्मार्टफोन 20,010 रुपयांच्या बचतीत खरेदी करू शकतात. अॅमेझॉनच्या डील ऑफ द डे ऑफरखाली हा फोन सूचीबद्ध करण्यात आला आहे. येथे ग्राहक 59,990 रुपयांमध्ये फोन खरेदी करू शकतील. फोन खरेदीवर मोठ्या सवलतीच्या ऑफर देण्यात येत आहेत. यामध्ये विनिमय ऑफर, बँकिंग सूट यासह विविध सवलतींचा समावेश आहे.

डिस्काउंट ऑफर -

LG Wing स्मार्टफोन Amazon Deal of the Day offer मध्ये कोटक बँकेच्या क्रेडिट व डेबिट कार्ड वरून 5% आणि जास्तीत जास्त 1,500 रुपयांच्या सवलतीत ग्राहक फोन खरेदी करू शकतात. तसेच फोन खरेदीवर 12,400 रुपयांची सूट ऑफर देण्यात येत आहे. याशिवाय हा फोन नो-कॉस्ट EMI पर्यायावर खरेदी करता येईल. हा फोन दरमहा 2,824 रुपयांच्या ईएमआय पर्यायावर खरेदी करता येईल. (वाचा - iphone संदर्भात कंपनी घेऊन येणार नवी योजना, फोन ट्रॅक करण्यासाठी युजर्सची घ्यावी लागणार परवानगी)

LG Wing स्पेसिफिकेशन्स -

एलजी विंगमध्ये वापरकर्त्यांना ड्युअल टी-शेप मिळेल. आतापर्यंत बाजारात फक्त फोल्डिंग ड्युअल स्क्रीन असलेले स्मार्टफोन अस्तित्वात आहेत. एलजी विंगचा डिस्प्ले पूर्णपणे फिरवता येईल. एलजी विंगमध्ये वापरकर्त्यांना 6.8 इंचाची फुल एचडी P-OLED प्राइमरी स्क्रीन मिळेल. ज्याचा आस्पेक्ट रेशो 20.5:9 आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 765 जी 5 जी चिपसेटवर सादर करण्यात आला आहे. यात 8 जीबी रॅम आणि 256 जीबी अंतर्गत स्टोरेज आहे. ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 2 टीबी पर्यंत वाढवता येऊ शकते.

फोटोग्राफीसाठी एलजी स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यात 64 एमपी प्राइमरी सेन्सर, 13 एमपी अल्ट्रा वाइड अँगल शूटर आणि 12 एमपी थर्ड सेन्सर आहे. तसेच वापरकर्त्यांना व्हिडिओ कॉलिंग आणि त्यात सेल्फीसाठी 32 एमपीचा पॉप-अप कॅमेरा मिळेल. अँड्रॉइड 10 ओएसवर आधारित या स्मार्टफोनमध्ये पावर बॅकअपसाठी 4,000 एमएएच बॅटरी आहे.