ऑनलाईन शॉपिंग (Online Shopping) करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनने (Amazon) गेल्या वर्षी जानेवारीत अॅमेझॉन पे मध्ये कॅश लोड सर्व्हीस चा पर्याय सुरु केला होता. या सुविधेद्वारे ग्राहक डिलिव्हरीच्या वेळेस अॅमेझॉन पे वॉलेट टॉप अप करु शकतात. या खास ऑफरअंतर्गत ग्राहकांना 1000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. जर तुम्ही 5000 रुपये किंवा त्याहून अधिक रुपयांचे टॉप अप करत असाल तर तुम्हाला 1000 रुपयांचे कॅशबॅक दिले जात आहे.
31 जानेवारीपर्यंत ऑफर मर्यादीत
अॅमेझॉन ग्राहकांसाठी ही ऑफर 12 जानेवारीपासून सुरु झाली असून 31 जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. पण या ऑफरचा लाभ तुम्ही कसा घेणार? या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला डिलिव्हरी यंत्रणेच्या मदतीने पे वॉलेट रिचार्ज करुन घ्या. टॉप अप केल्यानंतर अॅमेझॉन पे वॉलेटमधून तुमच्या खरेदीची बिल चुकती केली जातील. मात्र या ऑफरचा फायदा तुम्ही एकदाच घेऊ शकाल.
होम डिलिव्हरीवर देखील मिळेल लाभ
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग केल्यास तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडावा लागेल. ऑर्डर आल्यानंतर डिलिव्हरी यंत्रणेच्या मदतीने तुम्ही अॅमेझॉन पे वॉलेट टॉप अप करु शकता. त्यानंतर कॅशबॅक अॅमेझॉन गिफ्ट कार्डच्या स्वरुपात युजर्सला अकाऊंटमध्ये लिंक केले जाईल. टॉपअप केल्यानंतर एका आठवड्यात तुम्हाला कॅशबॅक मिळेल.