Akira Ransomware Attack Warning: माहिती चोरणार्‍या नव्या मालवेअर बाबत सरकार कडून अलर्ट जारी
Cyber Security | Image Used for Representational Purpose (Photo Credits: Pexels)

भारत सरकारने Internet ransomware "Akira" बद्दल युजर्सना अलर्ट केले आहे. हा वायरस माहिती चोरून extortion करू शकतो असं सांगण्यात आले आहे. CERT-In या भारत सरकारच्या टेक्नॉलॉजी आर्म कडून ही माहिती देण्यात आली आहे. सायबर अटॅक्स बाबत जागृती निर्माण करताना त्यांनी "Akira" हा कम्प्युटर मालवेअर विंडोज आणि लिनक्स बेस्ड सिस्टिम्स वर हल्ला करू शकतो अशी माहिती देण्यात आली आहे.

वायरस द्वारा माहिती चोरली जाते आणि नंतर त्यांच्या सिस्टमवरील डेटा एन्क्रिप्ट करते. हे एकदा झाले की double extortion होते अशा प्रकारे पीडिताला खंडणीची रक्कम भरण्यास भाग पाडते. अ‍ॅडव्हायजरी मध्ये दिलेल्या माहितीनुसार, जर पीडीत युजर ने पैसे भरले नाही तर त्याचा डाटा डार्क वेब ब्लॉग वर टाकला जातो.

CERT-In कडून सूचवण्यात आले आहे की इंटरनेट युजर्सनी अशा हल्ल्यांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी online hygiene and protection प्रोटोकॉल वापरावे. युजर्सने ऑफलाईन बॅकअप घेऊन ठेवावेत. तसेच ते अपडेट देखील करत रहावेत. यामुळे अटॅक दरम्यान मोठं नुकसान होण्यापासून टाळलं जाऊ शकतं. तसेच युजर्सनी देखील स्ट्रॉंग पासवर्ड ठेवावेत असंही आवाहन करण्यात आलं आहे.