Airtel Payments Bank: एअरटेल पेमेंट बँकेने सुरू केली 24x7 NEFT सेवा; सुट्टीच्या दिवशीही पैसे ट्रान्सफर करता येणार
Airtel Payments Bank (PC - Facebook)

Airtel Payments Bank: एअरटेल या मोबाईल कंपनीने डिजीटल आणि पेपरलेस बँक सुरू केली होती. ही देशातील पहिली पेमेंट बँक ठरली आहे. आता एअरटेल पेमेंट बँक ग्राहकांना 24x7 सेवा देणार आहे. या बँकेने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गाइडलाइन्सवर आधारित 24x7 NEFT (National Electronic Funds Transfer) सेवा सुरू केली आहे. एअरटेल पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांना आता 24 तास या सेवेचा लाभ घेता येणार आहे. विशेष म्हणजे ग्राहक आता सुट्टीच्या दिवशीही पैसे ट्रान्सफर करू शकणार आहेत. बँकेच्या या सुविधेसाठी ग्राहक 'एअरटेल थँक्स अॅप' या वेबसाइटच्या बँकिंग विभागात जाऊन NEFT करू शकतात. त्यामुळे ग्राहक आता आपल्या वेळेनुसार पैसे ट्रान्सफर करु शकणार आहेत.

ग्राहकांना या सेवेचा लाभ घेण्यासाठी Transfer Money हा पर्याय निवडावा लागणार आहे. त्यानंतर 'Transfer to Bank' या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर रजिस्टर करण्याचा पर्याय उघडेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ग्राहक सोप्या पद्धतीने पैसे ट्रान्सफर करू शकतील. (हेही वाचा - Online Fraud Case: ऑनलाईन फसवणुकीच्या संख्येत वाढ; या पद्धतीने केली जाते अनेकांची लूट)

एअरटेल पेमेंट बँक आपल्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. 24x7 सेवेमुळे ग्राहकांना सोप्या पद्धतीने पैसे ट्रान्सफर करता येतील, असं एअरटेल पेमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश अनंत नारायण यांनी सांगितलं आहे.