AI-Powered Sex Dolls: चीन घेऊन येत आहे नेक्स्ट जनरेशन एआय सेक्स डॉल; देणार खऱ्या जीवनासारखा लैंगिक आनंद, जाणून घ्या काय आहे खास
Sex dolls (Photo credits: Instagram)

AI-Powered Sex Dolls: तंत्रज्ञानामुळे (Technology) लोकांचे जीवन प्रगत आणि काही प्रमाणात सुकर झाले आहे. त्यात आता एआयच्या (AI) आगमनाने व्यवसाय, उद्योगांचाही चेहरामोहरा बदलत आहे. आता भारताचा शेजारी देश चीनमधील (China) शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांनी नेक्स्ट जनरेशन सेक्स डॉल (Next Generation Sex Doll) तयार केली आहे. चिनी कंपन्या ही सेक्स डॉल ऑगस्ट महिन्यापर्यंत बाजारात आणणार आहेत. चॅट जीपीटी आणि एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने ही सेक्स डॉल विकसित करण्यात आली आहे.

सेक्स डॉल बनवण्यामागे लोकांचा एकटेपणा दूर करणे हा उद्देश असल्याचे कंपनी निर्मात्यांचे म्हणणे आहे. या बाहुल्या केवळ शाब्दिक आणि शारीरिकदृष्ट्याच लोकांशी संवाद साधण्यास सक्षम नाहीत, तर त्या भावनिकदृष्ट्याही मदत करतील. चीनमध्ये सेक्स डॉलचा मोठा व्यवसाय आहे आणि त्याला खूप मागणी आहे. आता स्टारपेरी टेक्नॉलॉजी ही शेन्झेनस्थित कंपनी या नेक्स्ट जनरेशन सेक्स डॉलची निर्मिती करत आहे.

स्टारपरी कंपनीचे सीईओ इव्हान ली नवीन प्रकल्पाबद्दल खूप आनंदी आहेत. त्यांनी साऊथ चायना मॉर्निंग पोस्टला सांगितले की, 'आम्ही एक सेक्स डॉल बनवत आहोत जी बोलू शकते आणि वापरकर्त्यांशी शारीरिक संवादही साधू शकते. या बाहुलीचा प्रोटोटाइप यावर्षी ऑगस्टपर्यंत तयार होईल. आजच्या सेक्स डॉल फक्त साधी उत्तरे देऊ शकतात, पण या नवीन बाहुलीमध्ये प्रगत सेन्सर्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) असेल. याचा अर्थ असा की, ही बाहुली हलवण्यास आणि बोलण्यास सक्षम असेल, ज्यामुळे वापरकर्त्याला वास्तविक जीवनाचा अनुभव मिळेल.

अभूतपूर्व क्षमता असलेल्या या सेक्स डॉल्स पुरुष आणि स्त्री अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहेत. कंपनीने म्हटले की, या डॉलसोबतचे संभाषण पूर्णपणे अस्सल बनवणे हे कठीण असले तरी, कंपनी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेत आहे. असे गुंतागुंतीचे रोबोट बनवणे सोपे काम नाही. यातील मोठे आव्हान म्हणजे बॅटरीची क्षमता. इलेक्ट्रिक वाहनांप्रमाणे, या रोबोट्समध्ये मोठ्या बॅटरी ठेवण्यासाठी जागा नसते. दुसरे आव्हान म्हणजे मानवी स्नायूंची नक्कल करणे. (हेही वाचा: Financial Frauds: गेल्या 3 वर्षांत जवळपास 47 टक्के भारतीयांची झाली आर्थिक फसवणूक; UPI आणि Credit Card संबंधित प्रकरणे सर्वाधिक)

कंपनीने बाहुल्यांचे वजन कमी करण्याकडेही लक्ष दिले आहे. जुलै 2023 पर्यंत, त्यांनी 172cm (5 फूट, 6 इंच) उंच बाहुल्यांचे वजन 40 किलोवरून 29 किलोपर्यंत कमी केले, जे पूर्वीपेक्षा बरेच चांगले आहे. ही सेक्स डॉल ही धातू आणि सिलिकॉनपासून बनलेली आहे. सध्या, या कंपनीच्या बाहुल्यांची किंमत सुमारे $1,500 (अंदाजे 1.25 लाख) आहे, जी इतर कंपन्यांच्या प्रगत बाहुल्यांपेक्षा खूपच कमी आहे.