ATM चा उपयोग न करता काढता येणार पैसे, 'या' कंपनीची Cash Withdrawal साठी नवी सुविधा
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: Money Control.com)

मुंबई मधील एका कंपनी पैसे काढण्यासाठी एटीएम कार्डचा उपयोग न करता ग्राहकांना पैसे काढता येतील अशी सुविधा लवकरच उपलब्ध करुन देणार आहे. AGS ट्रांजॅक्ट टेक्नॉलॉजी नावाच्या कंपनीने ही सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्राहकांना एटीएमद्वारे पैसे काढण्याची गरज भासणार नसून फक्त एका यूपीआई संकेताची गरज भासणार आहे. पैसे काढणाऱ्या ग्राहकाने त्याच्या मोबाईलच्या सहाय्याने एटीएमच्या स्क्रिनवर दिसून येणारा QR Code स्कॅन करुन युपीआय (UPI) क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर एटीएम मशिनच्याद्वारे ग्राहकांने टाकलेली रक्कम त्याला मिळणार आहे.

परंतु एजीएस कंपनी या नव्या टेक्नॉलॉजीला नॅशल पेमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून हिरवा कंदील दाखवण्याची प्रतिक्षा करत आहेत. परंतु कंपनीकडून या टेक्नॉलॉजीसाठी पुढील महिन्यापर्यंत मान्यता मिळेल असे सांगण्यात येत आहे. तसेच कंपनीकडून नवीन एटीएम मशीनसह नव्या टेक्नॉलॉजी यंत्रणेसह बनविण्याची तयारी करत आहेत.

अशा पद्धतीने ग्राहकांना ATM मधून पैसे काढता येणार:

या टेक्नॉलॉजीचा उपयोग ग्राहकांच्या सोईसुविधेसाठी करण्यात आला आहे. ग्राहकांनी एटीएम मशीनच्या सहाय्याने यूपीई कोडच्या माध्यमातून कॅश विड्रॉव्हल हे ऑप्शन निवडावे लागणार आहे. त्यानंतर ग्राहकाला हवी असेली रक्कम त्यामध्ये टाकायची आहे. असे केल्यानंतर एटीएमच्या स्क्रिनवर एक QR Code उपलब्ध होईल. हा QR Code मोबाईलवर स्कॅन केल्यावर युपीआय अॅपच्या माध्यमातून पिनकोड टाकून पैसे काढता येणार आहेत.