Adani ग्राहकांना कमी किंमतीत मिळणार Energy Saving फ्रिज; पहा कसे कराल अप्लाय
Representational Image (Photo Credits-Getty Images)

अदानी इलेक्ट्रिसिटीने (Adani Electricity) आज (14 जुलै) इनर्जी इफिशिएंट 5 स्टार रेटेड रेफ्रिजिरेटर प्रोग्रॅमची (Energy Efficient 5 Star Rated Refrigerator Programme) घोषणा केली. हा प्रोग्रॅम मुंबई (Mumbai) उपगनगरातील ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. सध्या मुंबईत अदानीचे एकूण 29 लाख ग्राहक आहेत. ऊर्जा बचत हा या प्रोग्रॅम मागील उद्देश आहे. या प्रोग्रॅम अंतर्गत अदानी इलेक्ट्रिसिटीकडून नवीन फ्रिज खरेदी किंवा जुन्या फ्रिजच्या एक्सचेंजवर 47% ते 56% डिस्काऊंट दिला जात आहे. त्याचबरोबर डबल डोअरच्या फ्रिजवर अॅडिशनल डिस्काऊंट दिला जात आहे.

5 स्टार रेफ्रिजिरेटर घेणे ग्राहकांच्या पथ्यावर पडणार आहे. फ्रिज 24 तास सुरु असतो. मात्र तो 5 स्टार असल्यास महिन्याच्या वीज बिलात घट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Mumbai Airport आता Adani ग्रुप कडे; देशातील अन्य 6 आंतरराष्ट्रीय विमानतळांसह अदानी झाले भारतातील सर्वात मोठे एअरपोर्ट ऑपरेटर्स)

या प्रोग्रॅमअंतर्गत दिल्या जाणाऱ्या फ्रिजची किंमत 23,500 ते 25,500 इतकी आहे. प्रोग्रॅम अंतर्गत अदानीच्या ग्राहकांना हे फ्रिज 12,300 ते 13,800 रुपयांना मिळू शकतात. फ्रिजची किंमत ही ग्राहकांच्या निवडीनुसार बदलू शकते. त्यासोबतच फ्रिजच्या मॉडल्सच्या उपलब्धतेनुसार सुद्धा फ्रिजची किंमत बदलू शकते.

यापूर्वी अदानीकडून अशाप्रकारचे 3 प्रोग्रॅम राबवण्यात आले होते. या अंतर्गत 25 हजार 5 स्टार इनर्जी इफिशिएंट रेटिंग असलेले सिलिंग फॅन्स आणि 6500 रेफ्रिजिरेटर सबसिडाईज किंमतीवर घरगुती ग्राहकांना देण्यात आले होते. या प्रोग्रॅममध्ये रजिस्ट्रर करण्यासाठी अदानीच्या ग्राहकांनी www.adanielectricity.com या संकेतस्थळावर भेट द्यावी किंवा 19122 या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही 24x7 कॉल करु शकता. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला तुमचे नाव, कस्टमर अकाऊंट नंबर आणि संपर्क क्रमांक देणे गरजेचे आहे.