मार्च महिन्याच्या अखेरीस Royal Enfield Bullet 500, Honda Navi, Honda CBR 250R यांच्यासह 'या' 5 बाईक होणार बंद

सर्वोच्च न्यायालयाने निर्देशानुसार 31 मार्चनंतर बीएस 4 इंजिन (BS4) प्रकारच्या वाहनांची नोंदणी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. वाढत्या प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नवीन गाडी घेताना त्या गाडीची नोंदणी 31 मार्चपूर्वी होणे आवश्यक आहे. त्यानंतर कोणी बीएस इंजिन प्रकारची गाडी खरेदी केल्यास तिची नोंदणी होणार नसल्याचे पुण्याचे परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी स्पष्ट केले होते. भारतात 31 मार्चनंतर बीएस 4 वाहनांची नोंदणी बंद होणार आहे. त्यामुळे दुचाकी कंपन्या मोठ्या वेगाने आपल्या वाहनांना बीएस6 मध्ये अपग्रेड करीत आहे. बीएस6 व्हर्जन लागू होण्यास आता केवळ दोन आठवड्याहून कमी वेळ राहिला आहे. त्यामुळे ज्या मॉडेल्सना बीएस6 मध्ये अपग्रेड करण्यात येवू शकत नाही. त्या वाहनांना बंद करण्यात येत आहे. यात रॉयल इन्फिल्ड बुलेट 500, होन्डा नावी, होन्डा सीबीआर 250आर यांसारख्या दुचाकी वाहनांचा समावेश आहे. याशिवाय, 31 मार्चला बंद होणाऱ्या दुचाकी माहिती घ्या जाणून.

सध्या तरुण पीढी चारचाकी वाहनांपेक्षा दुचाकी खरेदी करण्याचे अधिक वेड आहे. परंतु, बीएस 4 इंजिन असलेल्या दुचाकी 31 मार्चपासून बंद होणार आहेत, याची माहिती नसल्याने अनेकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 31 मार्चला बंद होणाऱ्या दुचाकीत अधिक विक्री होणाऱ्या वाहनांचाही समावेश आहे. यामुळे दुचाकी चाहत्याने वाहन खरेदी करण्यापूर्वी खालील माहिती नक्की वाचलीच पाहिजे. हे देखील वाचा- Coronavirus: WHO ने सुरु केला व्हॉट्सऍप हेल्पलाईन क्रमांक; कोरोना व्हायरसबाबत आता एका क्लिकवर मिळवा संपूर्ण माहिती

होन्डा नावी (Honda Navi)

बीएस6 लागू झाल्यानंतर होन्डाची ही दुचाकी बंद करण्यात येणार आहे. भारतीय बाजारात याची डिमांड कमी झाल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. परंतु, याचे उत्पादन बंद करण्यात येणार नाही. भारतात बनवून ही दुचाकी परदेशात निर्यात करण्यात येणार आहे. भारतापेक्षा अमेरिकेच्या लॅटिनमध्ये या दुचाकीला मोठी मागणी आहे.

होन्डा सीबीआर250आर (Honda CBR250R)

ही खूप प्रसिद्ध आणि आकर्षक दुचाकी आहे. ही दुचाकी तरुणांमध्ये खूप लोकप्रिय अशी आहे. बजाज आणि केटीएमची नवीन दुचाकी आल्यानंतर याची पब्लिसिट कमी झाली आहे. होन्डाने आपली ही स्पोर्ट्स दुचाकी बीएस6 व्हर्जनमध्ये अपग्रेड करणार नाही. त्यामुळे ही दुचाकी बंद करण्यात येणार आहे.

रॉयल इनफिल्ड क्लासिक 500 (Royal Enfield Classic 500)

बीएस 6 लागू होताच रॉयल इनफिल्डची ही दमदार दुचाकी बंद होणार आहे. कारण याचे छोटी क्लासिक 350 ला बीएस6 मध्ये अपग्रेड करण्यात येत आहे. परंतु, यासाठी थोडा वेळ लागणार आहे. कंपनीने ट्रिब्यूट एडिशन लाँच केला होता. ते क्लासिक 500 दुचाकी आहेत.

होन्डा क्लिक (Honda Cliq)

बीएस 6 चा परिणाम या दुचाकीवरही पडला आहे. काही दिवसांनंतर ही दुचाकी बंद केली जाणार आहे. कंपनीने याआधीच ही दुचाकी बंद करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. ही स्कूटर मार्केटमध्ये यशस्वी झाली नाही. या दुचाकीला ग्रामीण भारतातील परिसर लक्षात ठेवून बनवण्यात आले होते. परंतु, या दुचाकीने काही कमाल केली नाही.

रॉयल इनफिल्ड बुलेट 500 (Royal Enfield Bullet 500)

क्लासिक 500 सह रॉयल इनफिल्ड आपली पॉवरफुल दुचाकी बुलेट 500 बंद करणार आहे. याची सध्या कमी किंमतीत विक्री सुरू असतानाही कंपनीने ही दुचाकी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, क्लासिक 500 आणि बुलेट 500 मध्ये एक इंजिन देण्यात आले आहे.