![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/07/Image-34-380x214.jpg)
कपाटाचा दरवाजा उघडताच अंगावर झेप घेणारे, कधी बेड वर तर कधी जमिनीवर अस्थाव्यस्थ पडलेले कपडे हा नजारा प्रत्येकाने कधी ना कधी पहिला असेल, आणि मग यावर 'एकदा सुट्टी मिळूदे हे' असं म्हणत कपडे घड्या करून बंदोबस्त करण्याचा निर्धारही केला असेल पण नेहमीप्रमाणे यात आपला आळस आड येऊन हे काम लांबणीवरच पडतं, काही वर्षांपूर्वी, विदेशी शास्त्रज्ञांनी अशा मंडळींसाठी एक कपडे घडी घालणारा रोबोट बनवला होता मात्र या रोबोटची किंमत फक्त श्रीमंतांना परवडेल एवढी होती, त्यामुळे पैसे नाहीत पण आळस आहे अशा मंडळींना काहीच मार्ग उपलब्ध नव्हता. पण आता यावर नायझेरिया (Nigeria) मधील 12 वर्षीय फातिमा अब्दुल्लाही (Fatima Abdullahi) हिने मार्ग शोधून काढला आहे. फातिमाने घरच्याघरी अवघ्या काहीच रुपयांमध्ये कपड्यांची घडी घालणारा एक रोबोट तयार केला, आश्चर्य म्हणजे हा रोबो अवघ्या तीन सेकेंदात कपडा घडी करू शकतो. याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
पहा कपडे घडी करणारा रोबो
From ReutersTV: A 12-year-old Nigerian coder has made a robot that can fold clothes and grab nearby objects pic.twitter.com/O3sx4GuWbG
— Reuters Top News (@Reuters) July 13, 2019
फातिमा ही एक कोडिंग शिकणारी विद्यार्थिनी असून तिने याच ज्ञानाच्या आधारे हा रोबो बनवला आहे. ‘शनिवारी आणि रविवारी खूप कपडे धुतल्यानंतर त्यांच्या घड्या घालण्याच्या कामाला बराच वेळ लागतो. त्यावर उपाय म्हणून मी हा रोबोट बनवला आहे,यात ‘काही पीन, लाईट्सच्या बीम्स आणि एव्ही थ्री ब्रिक्स म्हणजे एखाद्या विशिष्ट उद्देशासाठी प्रोग्राम केलेले सर्कीट्सच्या मदतीने मी हा रोबोट तयार केला आहे,’असे तिने सांगितले , तसेच सध्या आपण हा रोबो घरीच वापरात आहोत पण काहीच दिवसात याला अधिक आकर्षक रूप देऊन स्थानिक बाजारात विक्री करण्याचा मानस फातिमाने व्यक्त केला आहे .