युजवेंद्र चहल (Photo Credit: @BCCI/VideoScreenGrab)

भारतीय लेग स्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) 'चहल टीव्ही'सह (Chahal TV) परत आला असून त्याचा नवीन व्हिडिओ बीसीसीआयने ट्विटरवर पोस्ट केली. कोरोना व्हायरसमुळे चालू असलेल्या लॉकडाऊन कालावधीत चहलने मंगळवारी चहल टीव्हीचा 'होम एडिशन' आणला. या क्लिपमध्ये चहलने चाहत्यांना त्याच्या घराची झलक घडवून दिली आणि लॉकडाउन दरम्यान आपल्या विशिष्ट अंदाजात घरामध्येच राहण्याचे महत्त्व सांगितले. “चहल टीव्ही होम एडिशन. युजवेंद्र चहल यांचा खास संदेश. घरी राहा सुरक्षित रहा, ”बीसीसीआयने (BCCI) लिहिले.  व्हिडिओच्या सुरूवातीस चहल म्हणाला की तो घरी कसा वेळ घालवत आहे. एकीकडे भारतीय आणि अन्य देशातील क्रिकेटपटू लॉकडाउनमध्ये घरच्यांसोबत दुर्मिळ असा वेळ घालवत आहे, तर युजवेंद्र सध्या टिकटॉक स्टार बनला आहे. लॉकडाउन जाहीर केल्यापासून चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी चहल गेली अनेक दिवस टिकटॉकवरील त्याचे व्हिडिओ शेअर करत आहे. यात तो त्याचे पालकांसोबत दिसत आहे. (लॉकडाउनमध्ये युजवेंद्र चहल ने केला फॅमिली डान्स, 'ढिंच्यॅक पूजासोबत चांगली जोडी बनेल' म्हणत Netizens ने केले ट्रोल)

बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये चहल म्हणाला, “मी झोपतो, जेवतो, मी माझ्या कुटूंबातील सदस्यांसह आणि कुत्र्यांसमवेत वेळ घालवतो आणि खेळतो.” त्याने आपल्या घरातील आरामदायक जागा दाखवली आणि आपल्या दोन कुत्र्यांना भेट घडवून दिली. पण चहल टीव्हीचा एपिसोड विनोद आणि मजेशिवाय कसा पार पडणार. व्हिडिओच्या अखेरीस लोकांना घरात राहण्यास सांगत असताना चहल म्हणाला की "जे लोकं घरात राहणार नाहीत ते बाहेर जाऊन थोडासा मसाज घेऊ शकतात." याद्वारे तो पोलिसांबद्दल बोलत होता जे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर दंदे मारत आहे.

भारत सध्या 21 दिवसांच्या लॉकडाउनच्या मध्यभागी आहे परंतु कोरोना व्हायरसच्या घटनांमध्ये तीव्रतेने वाढ होत आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 4,000 हुन अधिक झाली आहे, तर 100 पेक्षा अधिक लोकांना प्राण गमवावे लागले आहे.