Women's Asia Cup: महिला आशिया चषकाला आजपासून सुरूवात, भारतीय महिला संघ भिडणार श्रीलंकेशी
Indian Women's Cricket Team (Photo Credit - Twitter)

महिला आशिया चषक (Women's Asia Cup) आजपासून सुरू झाला आहे.  पहिल्या सामन्यात यजमान बांगलादेश महिला क्रिकेट संघ आणि थायलंड संघ (BAN W vs TL W) आमनेसामने आहेत. हा सामना सिलहटमध्ये (Sylhet) खेळला जात आहे. या सामन्यानंतर लगेचच भारतीय महिला संघही (Indian Women's Team) आज आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. भारताचा सामना श्रीलंकेच्या संघाशी (IND W vs SL W) आहे. हा सामनाही सिलहटमध्येच होणार आहे. या सामन्यासाठी श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाचे पारडे जड दिसत आहे. भारतीय संघाने या दोन संघांमधील मागील 5 पैकी 4 सामने जिंकले आहेत. या वर्षी जूनमध्ये झालेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताने श्रीलंकेचा 2-1 असा पराभव केला होता.

भारत आणि श्रीलंकेच्या या संघांचा सामना आज दुपारी 1 वाजता सुरू होणार आहे. हा सामना सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिन्यांवर होणार आहे. डिस्ने+हॉटस्टार चॅनेलवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल. महिला आशिया चषक स्पर्धेत एकूण सात संघ सहभागी होत आहेत. हेही वाचा Sourav Ganguly On Jasprit Bumrah: टीम इंडियाच्या आशा अजून संपलेल्या नाहीत, जसप्रीत बुमराहच्या दुखापतीवर सौरव गांगुलीने केले मोठे वक्तव्य

यात भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, थायलंड, मलेशिया आणि यूएईचे संघ आहेत. पहिल्या फेरीत सर्व संघ एकमेकांविरुद्ध एक सामना खेळतील. म्हणजेच सर्व संघांना 6-6 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. यानंतर या सात संघांपैकी टॉप-4 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील.

टीम इंडिया:

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), राजेश्वरी गायकवाड, रिचा घोष, दयालन हेमलता, सबनैनी मेघना, मेघना सिंग, किरण नवगिरे, स्नेह राणा, रेणुका सिंग, जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, पूजा शर्मा, व्ही. यादव.