Dutee Chand Posts Photo with Girlfriend: धावपटू दुती चंदने आपली मैत्रिण मोनालिसाशी केलं लग्न? 'हा' फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण
Dutee Chand Posts Photo with Girlfriend (PC - Twitter/ @DuteeChand)

Dutee Chand Posts Photo with Girlfriend: भारताची अॅथलीट दुती चंद (Dutee Chand) ने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये तिच्यासोबत महिला समलैंगिक जोडीदार बसलेली आहे. 100 मीटरमध्ये राष्ट्रीय विक्रम करणाऱ्या आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन रौप्य पदके जिंकणाऱ्या दुती चंदने आपण समलिंगी संबंधात असल्याचे आधीच जाहीर केले आहे. अशातचं आता सोशल मीडियावर दुतीने शेअर केलेला फोटो तिच्या लग्नाच्या अफवांना खतपाणी घालत आहे.

सोशल मीडियावर तिच्या महिला मैत्रिणीसोबतचा फोटो शेअर केल्यानंतर आता दुतीच्या लग्न झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र दुती चंद यांनी अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. सोशल मीडियावर लोक या खेळाडूचे अभिनंदन करत आहेत. (हेही वाचा -Nora Fatehi: जगप्रसिध्द फिफा विश्वचषकात अभिनेत्री नोरा फतेहीला एक चुक पडली महागात, सोशल मिडीयावर नेटकऱ्यांकडून नोरा ट्रोल)

दुतीच्या बहिणीचे आदल्या दिवशी लग्न झाले होते. बहिणीच्या लग्नात तिची मैत्रीण मोनालिसाही उपस्थित होती. तिने आपली गर्लफ्रेंड मोनालिसासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. तिने ट्विटर अकाऊंटवर आपल्या गे पार्टनरबद्दलही लिहिले आहे की, 'मी कालही तुझ्यावर प्रेम करत होते आणि आजही तुझ्यावर प्रेम करत आहे'.

दुती चंद ही ओडिशाचा रहिवासी आहे. तिचा जन्म ओडिशातील जिजापूर जिल्ह्यात झाला. ती धावपटू असून तिने देशासाठी अनेक पदके जिंकली आहेत. 2012 अंडर-18 राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये तिने 100 मीटर शर्यतीत नवीन विक्रम प्रस्थापित केला तेव्हा दुती प्रसिद्धीच्या झोतात आली. यानंतर, 2013 मध्ये, तिने आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या 200 मीटर प्रकारात कांस्यपदक जिंकले. ट्रॅक आणि फील्डमध्ये, दुतीने 100 मीटर शर्यतीत 11.32 सेकंद घेतले आहेत. 2019 मध्ये इटलीमध्ये झालेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्येही दुतीने विक्रम केला होता.