माजी अनुभवी क्रिकेटपटू राहुल द्रविड (Cricketer Rahul Dravid) श्रीलंका दौऱ्यावर (Srilanka tour) पहिल्यांदा टीम इंडियाच्या (Team India) प्रशिक्षकाच्या (Coach) भूमिकेत दिसला. राहुल द्रविडची लवकरच टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती होऊ शकते. अशी चर्चा आहे. प्रशिक्षक होण्याच्या प्रश्नांवर खुद्द राहुल द्रविडने मौन तोडले आहे. राहुल द्रविड म्हणतो की तो सध्या राष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक होण्याचा विचार करत नाही आहे. राहुल द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (National Cricket Academy) अध्यक्ष आहेत. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) इंग्लंडमध्ये (England) असल्याने राहुल द्रविडने श्रीलंका दौऱ्यात प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली आहे. राहुल द्रविड म्हणतो की त्याने श्रीलंकेत कोचिंगचा अनुभव घेतला आहे. द्रविड म्हणाला मला हा अनुभव खूप आवडला. मी खरोखर भविष्याबद्दल काही विचार केलेला नाही.
द्रविडला विचारण्यात आले की भविष्यात संधी मिळाली तर तो कोचिंग पदाची जबाबदारी स्वीकारू इच्छितो का? हा महान फलंदाज म्हणाला, प्रामाणिकपणे सांगायचे तर, मी आता जे करत आहे त्यात मी आनंदी आहे. मी या दौऱ्याशिवाय इतर कशाचाही विचार केला नाही. द्रविड आता पुढे विचार करत नाही. तो म्हणाला, "मी या अनुभवाचा आनंद घेतला आहे आणि मला या खेळाडूंसोबत काम करायला आवडते. ते खूप भारी होते. आणि मी इतर कशाचाही विचार केला नाही. पूर्णवेळ भूमिका साकारण्यात अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे मला खरंच माहित नाही. अशी प्रतिक्रिया द्रविडने यावेळी दिली आहे.
दरम्यान भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री सध्या भारतीय कसोटी संघासोबत आहेत ज्यांनी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी न्यूझीलंडकडून गमावली होती. आता ते इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची मालिका खेळणार आहेत. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान युएई आणि ओमान येथे खेळल्या जाणार्या टी -२० विश्वचषक संपेपर्यंत शास्त्रीचा करार आहे. शास्त्री 59 वर्षाचे आहेत. भारतीय प्रशिक्षकपदासाठी कमाल वयोमर्यादा 60 वर्षे आहे. म्हणून पुन्हा अर्ज करायचा की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही.