Gurnoor Brar

आयपीएलच्या (IPL) 16व्या हंगामातील 38वा सामना सध्या पंजाब किंग्ज (PBKS) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात 22 वर्षीय युवा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारला (Gurnoor Brar) पंजाब किंग्जकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. मोहालीच्या स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात पंजाबचा कर्णधार शिखर धवनने (Shikhar Dhawan) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरनूर ब्रारबद्दल सांगायचे तर तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाब संघाकडून खेळतो.

राज अंगद बावा दुखापतीमुळे संपूर्ण हंगामासाठी बाहेर असताना हंगामाच्या मध्यात पंजाब किंग्जने त्याचा संघात समावेश केला होता. गुरनूरला पंजाब किंग्जने 20 लाख रुपयांना आपल्या संघात सामील करून घेतले. ब्रारच्या आतापर्यंतच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तो एक अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळतो. गुरनूरने आतापर्यंत 5 प्रथम श्रेणी आणि 1 लिस्ट-ए सामना खेळला आहे. ब्रारने आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 7 विकेट घेतल्या आहेत. हेही वाचा IPL 2023: कोलकाता नाइट रायडर्सला मोठा धक्का, 'हा' खेळाडू मायदेशी परतला

याशिवाय त्याने एकमेव लिस्ट ए सामन्यात केवळ 1 विकेट घेतली आहे. याशिवाय ब्रारने प्रथम श्रेणीमध्ये अर्धशतकही नोंदवले असून त्याने आतापर्यंत 26.75 च्या सरासरीने 107 धावा केल्या आहेत. लखनौ विरुद्ध पंजाब संघाच्या प्लेइंग 11 बद्दल बोलायचे तर, गेल्या काही सामन्यांमध्ये दुखापतीमुळे बाहेर असलेला कर्णधार शिखर धवनचे पुनरागमन झाले आहे. यामुळे पंजाबच्या फलंदाजीलाही खूप बळ मिळेल कारण शिखर धवनने या मोसमात फलंदाजी करताना 116.50 च्या सरासरीने 233 धावा केल्या.