आयपीएलच्या (IPL) 16 व्या मोसमात, कौटुंबिक वैद्यकीय आणीबाणीमुळे मायदेशी परतलेल्या लिटन दासच्या (Liton Das) रूपाने कोलकाता नाइट रायडर्स (KKR) ला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आता या यष्टीरक्षक फलंदाजाची आयपीएलच्या या हंगामातील उर्वरित सामन्यांमध्ये खेळण्याची शक्यताही खूपच कमी आहे, कारण बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) त्याला फक्त 4 मे पर्यंत एनओसी जारी केली होती. या हंगामासाठी 28 वर्षीय लिटन दासचा कोलकाता नाईट रायडर्सने 50 लाख रुपयांमध्ये आपल्या संघात समावेश केला होता.
यानंतर, त्याला फक्त 1 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली जी त्याने दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध पदार्पण करताना खेळली. या सामन्यात लिटन दासने 4 चेंडूत केवळ 4 धावा केल्या. आता लिटन दासला आयर्लंड दौऱ्यावर 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत भाग घेण्यासाठी बांगलादेश संघासोबत जावे लागणार आहे. केकेआरने जारी केलेल्या निवेदनात त्याने म्हटले आहे की, कौटुंबिक आणीबाणीमुळे लिटन दासला आज सकाळी बांगलादेशला जावे लागले. हेही वाचा PBKS vs LSG: आज पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स येणार आमनेसामने, जाणून घ्या कोणाचा पगडा जड ?
या कठीण काळात आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहोत. कोलकाता नाईट रायडर्सच्या यंदाच्या मोसमातील कामगिरीबद्दल बोलायचे तर ते मैदानावर अपेक्षेप्रमाणे दिसले नाही. या मोसमात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 8 पैकी फक्त 3 सामन्यात संघाने विजय मिळवला आहे तर 5 मध्ये पराभव पत्करावा लागला आहे. KKR चा संघ सध्या 6 गुणांसह गुणतालिकेत 7 व्या स्थानावर आहे. संघाला प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के करायचे असेल, तर आगामी सामन्यांमध्ये अधिक चांगला खेळ दाखवावा लागेल.