महिला विश्वचषक २०१९ दिवस १ Google Doodle: पॅरिस मध्ये रंगणाऱ्या FIFA World Cup मधील पहिल्या सामन्यानिमित्त गुगलचे खास डुडल
womens football world cup 2019 google doodle (Photo Credits: Google)

फ्रान्सची (France) राजधानी पॅरिसमध्ये (Paris) आजपासून महिला फुटबॉल वर्ल्ड कप (Women's World Cup 2019 Day-1)  सुरु होत आहे. पुढील महिनाभर असणा-या या महिला फुटबॉल विश्वचषक 2019 विजेता ठरणा-या संघाला 24 कोटी रुपयांचे बक्षिस मिळणार आहे. सर्व जगभराचे लक्ष लागलेल्या या वर्ल्ड कपवर आज Google ने आपल्या खास शैलीत Doodle बनवले आहे. गुगल ने या डूडलमध्ये महिला खेळाडूंना मोठ्या उत्साहात फुटबॉल खेळताना दाखवले आहे.

याआधी पहिल्यांदा महिला फुटबॉल वर्ल्ड कप 1991 मध्ये खेळले गेले होते. त्यानंतर 7 वेळा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये एकूण 24 संघ सहभागी होणार आहेत. या सर्वांचे 6 च्या ग्रुपमध्ये विभाजन केले आहे. महिला फुटबॉल वर्ल्ड कपच्या उद्घाटन सोहळ्याचे मुख्य आकर्षण त्यात आयोजित करण्यात आलेले नानाविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील. या टुर्नामेंटची पहिली मॅच 7 जून ला म्हणजेच आज मेजबान फ्रान्स आणि दक्षिण कोरिया मध्ये रंगेल.

4 वर्षांपूर्वी 2015 मध्ये झालेल्या टुर्नामेंटमध्ये अमेरिकेच्या संघाने हा किताब पटकावला होता. तेव्हा त्यांनी अंतिम सामन्यात जपान ला 5-2 ने हरवले होते. यंदा ही अमेरिका संघ हा महिला फुटबॉल विश्वचषक 2019 च्या विजेतेपदावर आपले नाव कोरेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. याआधी अमेरिकेने 1991, 1999 आणि  2015 ह्या स्पर्धेत विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे.

चला तर पाहूया महिला फुटबॉल विश्वचषक 2019 मध्ये 24 संघाचे कोणत्या 6 ग्रुपमध्ये विभाजन केले आहे.

ग्रुप ए: फ्रान्स, नॉर्वे, दक्षिण कोरिया, नायझेरिया

ग्रुप बी: जर्मनी, स्पेन, चीन, दक्षिण आफ्रिका

ग्रुप सी: इटली, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, जमैका

ग्रुप डी: इंग्लंड, स्कॉटलंड, अर्जेंटीना, जापान

ग्रुप ई: नेदरलँड्स, कॅनडा, न्यूझीलंड, कॅमरून

ग्रुफ एफ: स्वीडन, अमेरिका, चिली, थायलंड

FIFA World Cup 2022: फुटबॉल विश्वचषकसाठी भारतीय संघाला खास आमंत्रण

संपुर्ण जगाला उत्सुकता लागून राहिलेला महिला फुटबॉल विश्वचषक 2019 हा आतापर्यंतची 8 वी स्पर्धा आहे. 7 जूनला रात्री 8:00 वाजता यातील पहिल्या सामन्याला पॅरिसमध्ये सुरुवात होईल. ह्या रोमहर्षक खेळाची देशभरातील सर्व फुटबॉल प्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत.