भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) ने वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप (World Wrestling Championship) मध्ये चमत्कार करून 2020 च्या ऑलिम्पिकचा कोटा मिळवला आहे. जागतिक कुस्ती स्पर्धेची सुरुवात मंगळवारी झाली, परंतु जपानच्या गतविजेत्या मयु मुकेडा कडून गतविजेत्या विश्व कुस्ती स्पर्धेतील जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडली. पण, ती भाग्यवान ठरली आणि तिला रेपेचेज फेरीत पदक जिंकण्याची संधी मिळाली. यासह, 2020 च्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी आता ती पहिल भारतीय कुस्तीपटू बनली आहे. जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमधील दुसर्या लढतीत यूएसएच्या सारा एन ला 8-2 ने पराभूत करून फोगाटने ऑलिम्पिक कोटा जिंकला. आता कांस्य पदकासाठी आज रात्री मारिया प्रेव्होलाराकीशी तिचा सामना होईल.
पहिल्या फेरीत विनेशने स्वीडनच्या रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सोफिया मॅटेसनला 13-0 ने पराभूत केले. पण, प्री-क्वार्टर फायनलमध्ये जपानच्या मयु मुकायदाकडून 0-7 असा पराभव पत्करावा लागला. विनेशच्या या कामगिरीनंतर योगेश्वर दत्त आणि क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी तिचे अभिनंदन केले आहे. सोशल मीडियावर, लोक अशा प्रकारे विनेश फोगाटचे अभिनंदन करीत आहेत-
किरेन रिजिजू
Wrestler @Phogat_Vinesh earns an #OlympicQuota after beating World #1 Sarah Hildebrandt 8-2 at World C’ships in Kazakhstan. @KirenRijiju congratulates her for adding another Olympic Quota to India's kitty and the superb performance she has displayed.
— Kiren Rijiju Office (@RijijuOffice) September 18, 2019
योगेश्वर दत्त
भारत के लिये पहला ओलंपिक कोटा जीतने के लिए बहुत-बहुत बधाई @Phogat_Vinesh!#worldwrestlingchampionships में आपके आज के कांस्य पदक मैच के लिये शुभकामनाएँ। #OlympicQuota #RoadToTokyo #Tokyo2020 pic.twitter.com/4m7DO86Ooi
— Yogeshwar Dutt (@DuttYogi) September 18, 2019
टीम इंडिया
Vinesh sets off on the #RoadToTokyo🗼
Years of sweat, strength, broken bones and the Bronze medal play-off bout of 53kg event at #WrestleNurSultan earns #TeamIndia its first qualification in #Wrestling for the #Tokyo2020 Olympic Games! #GoodLuck @Phogat_Vinesh @FederationWrest pic.twitter.com/cz7zhAFKs4
— Team India (@WeAreTeamIndia) September 18, 2019
हरियाणाच्या विनेशने राष्ट्रकुल आणि एशियन गेम्समध्ये जेतेपद जिंकले आहेत, परंतु आतापर्यंत जागतिक चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकण्यात ती अपयशी ठरली आहे. पहिल्या 60-70 सेकंदात कोणतेही गुण मिळू शकले नाहीत कारण दोन्ही खेळाडू त्यावेळी एकमेकांची परीक्षा घेत होते. त्यानंतर, जपानी रेसलरने वर्चस्व राखले आणि विनेशने सलग गुण गमावले.