Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) आजचा दिवस भारतासाठी (India) संमिश्र ठरला. पीव्ही सिंधू (PV Sindhu) आणि अतानू दास (Atanu Das) यांनी पदकाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले तर देशाची दिग्गज बॉक्सर एमसी मेरी कॉमला (MC Mary Kom) धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंतचा सर्वात मोठा दल पाठवला असून यंदाच्या 120 अॅथलीट (67 पुरुष, 53 महिला) टोकियोमध्ये सहभागी घेणार आहे. टोक्यो ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी मीराबाई चानूच्या पहिल्या रौप्य पदकानंतर आता दुसर्या पदकाची आशा कायमच वाढत आहे. सातव्या दिवशी भारतीय खेळाडूंपैकी आर्चर दीपिका कुमारी (Deepika Kumari), पीव्ही सिंधू, मनु भाकर आणि राही सरनोबत (Rahi Sarnobat) पदकाच्या आशेने मैदानात उतरतील. भारतीय वेळेनुसार शुक्रवारी टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे वेळापत्रक जाणून घेऊया. (Tokyo Olympics 2020: 6-वेळ विश्वविजेती MC Mary Kom हिचे ऑलिम्पिक पदक हुकले, कोलंबियाच्या बॉक्सरने केला पराभव)
गुरुवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये चांगल्या दिवसानंतर खेळाच्या सातव्या दिवशी दीपिका कुमारी हिच्यासह पीव्ही सिंधू आणि भारत पुरुष हॉकी संघ शुक्रवारी टोकियो ऑलिम्पिक खेळात पदकाच्या दिशेने आगेकूच सुरु ठेवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील. दीपिका कुमारी वैयक्तिक स्पर्धेत 1/8 एलिमिनेशन फेरीत रशियाच्या केसेनिया पेरोवाशी सामना करेल तर पीव्ही सिंधूपुढे उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी जपानच्या अकाने यामागुचीचे आव्हान असेल. तसेचग क्वार्टर फायनलमध्ये यापूर्वीच स्थान मिळवल्यानंतर भारताचा पुरुष हॉकी संघ त्यांच्या पूल ए सामन्यात जपानविरुद्ध विजयी कामगिरी सुरु ठेवण्याच्या निर्धारित असेल. शिवाय, राही सरनोबत आणि मनु भाकर 25 मीटर पिस्टल महिला पात्रता रॅपिड इव्हेंटमध्ये खेळताना दिसतील.
Take a look at #TeamIndia schedule for #Tokyo2020 tomorrow, 30 July.
It is going to be an action packed day, so keep cheering for your favourite athletes with #Cheer4India and stay tuned for updates! pic.twitter.com/E7gH4BxR0a
— SAIMedia (@Media_SAI) July 29, 2021
कोरोना व्हायरस महामारीमुळे वर्षभराच्या विलंबानंतर, टोकियो ऑलिम्पिक खेळांची शुक्रवार, 23 जुलैपासून सुरुवात झाली. यंदा 127 भारतीय खेळाडू पदक जिंकण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावतील. यंदा भारत ऑलिम्पिक सहभागाचे 100वे वर्ष असून यंदा भारताला सर्वाधिक पदकांची अपेक्षा असणार असून भारतीय खेळाडू यंदा एकूण 18 क्रीडा प्रकारांत सहभाग घेत आहेत.