दीपक पुनिया (Photo Credit: IANS)

Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) खेळात 87 किलो फ्रीस्टाईल कुस्ती सामन्यात सॅन मारिनोच्या (San Marino) कुस्तीपटूने 2-4 ने पराभूत करत भारतीय कुस्तीपटू दीपक पुनियाचे  (Deepak Punia) टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कांस्यपदक जिंकण्याचे स्वप्न भंग केले. सुरुवातीला आघाडी घेऊनही दीपकने सामना 2-4 असा गमावला. बुधवारी उपांत्य फेरीत दीपक अमेरिकेच्या डेविड टेलरकडून पराभव पत्करावा लागला होता, पण दीपकला कांस्य पदक  (Bronze Medal) मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, आता या पराभवामुळे त्याला आता रिकाम्या हाती मायदेशी परतावे लागणार आहे. भारतीय कुस्तीपटू दीपक पुनियाने पुरुषांच्या फ्रीस्टाइल कुस्तीच्या 86 किलो गटात नायजेरियन कुस्तीपटू एकरेकेम एगियोमोरला 12-1 ने पराभूत करत टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत दणक्यात प्रवेश केला होता. (Tokyo Olympics 2020: रवी दहियाच्या हातून निसटला ‘गोल्डन’ चांस, रशियन जगज्जेत्याने अंतिम सामन्यात 7-4 ने दिला धोबीपछाड; भारताच्या पदरी दुसरे रौप्यपदक)

कांस्यपदकाच्या सामन्यात दीपकने पहिल्या कालावधीत पहिले दोन गुण मिळवले पण अमीननेही एक गुण मिळवला. यासह दीपकने पहिल्या कालावधीत अमीनवर वर्चस्व गाजवत 2-1 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या कालावधीत अमीनने पुनरागमन केले आणि दोन गुण मिळवून 3-2 अशी आघाडी घेतली. यानंतर, त्याने दीपकला लोळवून पुन्हा एक गुण मिळवला आणि यावेळी 4-2 अशी आघाडी घेत सामना जिंकून कांस्यपदक पटकावले. अशाप्रकारे दीपकला त्याची सुरुवातीची आघाडी कायम राखता आली नाही आणि टोकियो ऑलिम्पिकमधील त्याचा प्रवास संपुष्टात आला. पुनिया ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन आणि 2019 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक विजेता आहे.

दुसरीकडे, 23 वर्षीय भारतीय कुस्तीपटू रवी कुमार दहियाने टोकियो ऑलिम्पिक खेळात चमकदार कामगिरी केली. हरियाणाच्या रवीने 57 किलो कुस्ती प्रकारात देशासाठी रौप्य पदक पटकावले. रवीला रशियन पैलवानकडून 7-4 अशा फरकाने पराभवाचे तोंड पाहावे लागले आणि यासह कुश्ती खेळात भारताचे पहिले सुवर्ण पदक पटकावण्याचे त्याचे स्वप्न भंग झाले. ऑलिम्पिक कुश्ती खेळात भारताचे हे सहावे पदक ठरले. यापूर्वी खाशाबा जाधव, सुशील कुमार, योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिक यांनी या खेळात भारताला पदक जिंकून दिले होते. साक्षी आणि योगेश्वर यांच्याकडे कांस्य पदक जिंकले आहेत.