Tokyo Olympics 2020: सुरुवातीच्या टोकियो ऑलिम्पिक खेळाच्या (Tokyo Olympic Games) निराशेला मागे टाकत अतानु दास (Atanu Das) याने 29 जुलै रोजी एका जबरदस्त शोद्वारे भारतीय चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य परत आणले. प्रख्यात तिरंदाजाने (Archery) 2012 लंडन ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता Oh Jihyek याचा शूट-ऑफमध्ये पराभव करत अंतिम 16 फेरीत प्रवेश केला. यापूर्वी टोकियो गेम्समध्ये (Tokyo Games) प्रवीण जाधवने रँकिंग फेरीत उच्चांक गाठल्यानंतर अतानू तिरंदाजीच्या मिश्र-संघात प्रवेश करू शकला नाही. अतानूने जर मिश्र संघात प्रवेश केला असता तर तो त्याची पत्नी दीपिका कुमारी (Deepika Kumari) हिच्यासह स्पर्धा खेळला असता, परंतु दीपिका आणि जाधवच्या मिश्र जोडीने भारताचे नेतृत्व केले. परंतु वैयक्तिक कार्यक्रमाच्या राऊंड ऑफ 16 मध्ये आपली पत्नी दीपिकासह सामील करत अतानूने निराशेला मागे टाकले. (Tokyo Olympics 2020: तिरंदाजीत दीपिका कुमारीची कमाल, अंतिम-8 मध्ये केला प्रवेश)
दिवसाची सुरूवात अतानूने चिनी तायपेईच्या डेंग यू-चेंगचा पराभव करून 1/32 एलिमिनेशन (64 64 व्या क्रमांकाची) फेरीमध्ये 6-4 ने जिंकली. यानंतर अतानूचा सामना तिसऱ्या मानांकित कोरियन तिरंदाजाविरुद्ध झाला. क्रीडा क्षेत्रातील एक दिग्गज जिहेक या स्पर्धेत वाऱ्याशी झुंज देत असल्याचे दिसत होते, तर त्याच्या भारतीय प्रतिस्पर्ध्याला या स्पर्धेत वाऱ्याचा अधिक चांगला अनुभव आला. अतानूला पहिल्या सेटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला तर दुसरा सेट बरोबरीत राहिला. त्यानंतर भारतीय तिरंदाजाने चौथ्या सेट जिंकून स्कोअर 4-4 अशा बरोबरीत आणला. आणखी एका सेटमध्ये दोन्ही तिरंदाजांना बरोबरीत गुण मिळाले आणि दोघांना प्ले ऑफ खेळण्यात भाग पाडले. प्रथम जाऊन कोरियनने 9 गुण घेत भारतीयवर 10 पेक्षा कमी काहीही मिळवण्यासाठी दबाव आणला. आणि मग काय अतानूने जिहेकला परतीचा रस्ता दाखवण्यासाठी परफेक्ट 10 स्कोर केला.
.@ArcherAtanu of #IND wins 6-5 in a sensational shoot-off against #KOR's London 2012 Olympic champion Oh Jinhyek in Men's #Archery 1/16 Eliminations 👏#Tokyo2020 | #StrongerTogether | #UnitedByEmotion | #BestOfTokyo pic.twitter.com/pu5EjgtC89
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) July 29, 2021
दरम्यान, स्टार भारतीय तिरंदाजाचा अंतिम-16 च्या फेरीत सामना जपानच्या फुरुकावा ताकहारूशी होईल. हा सामना शनिवारी खेळला जाईल. “तो एक तणावपूर्ण क्षण होता. यापूर्वी मी शूट-ऑफचा सामना केला आहे. मला माहित आहे की तो आधी शूटिंग करीत आहे आणि जर त्याने नऊला शूट करेल तर मी जिंकू शकतो. मी फक्त माझे लक्ष राखण्यासाठी प्रयत्न केला. तो एक तणावपूर्ण क्षण होता, विजय किंवा पराभव परिस्थिती होती. म्हणून मी फक्त विजयासाठी गेलो,” अतानू वर्ल्ड आर्चरी मार्गे म्हणाला.