थॉमस आणि उबर कप (Thomas and Uber Cup) बॅडमिंटन स्पर्धा आता 2021 वर पुढे ढकलण्यात आली आहे. मार्च महिन्यात कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) लाइव्ह अक्शन थांबवल्यानंतर ऑल-इंग्लंड चॅम्पियनशिपनंतर स्थगित होणारी ही पहिली आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा ठरली. कोरोनाचा जगभरात होणार प्रादुर्भाव लक्षात घेत बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने (Badminton World Federation) अखेर स्पर्धा पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलली. जगभर करोनाची वाढती संख्येच्या पार्श्वभूमीवर सात देशांनी या स्पर्धामधून माघार घेतली. डेन्मार्क येथे 3 ते 11 ऑक्टोबर दरम्यान थॉमस आणि उबर कप बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार होते. कोरिया, थायलंड, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, तैवान, सिंगापूर आणि हाँगकाँग या सात देशांनी या स्पर्धेत खेळण्यास नकार दर्शवला आहे. या स्पर्धेनंतर डेन्मार्कमध्ये आणखी दोन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. (Jwala Gutta Engaged: बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाचा दाक्षिणात्य सुपरस्टारसोबत साखरपुडा, वाढदिवशी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत दिली आनंदाची बातमी)
बीडब्ल्यूएफने (BWF) स्थगित होण्याच्या कारणास्तव स्पष्टीकरण देताना अधिकृत निवेदन जाहीर केले की, “बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ), स्थानिक यजमान बॅडमिंटन डेन्मार्कशी पूर्ण सल्लामसलत व करार करून डेनमार्कच्या आरहस येथे होणाऱ्या टोटल बीडब्ल्यूएफ थॉमस व उबर कप फायनल्स 2020 पुढे ढकलण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. टोटस बीडब्ल्यूएफ थॉमस व उबर कप फायनल्स व एचएसबीसी बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरच्या युरोपियन लेगमधून अनेक सहभागी संघांना माघार घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे." भारतीय शटलर सायना नेहवालनेही या स्पर्धेच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ‘‘करोनामुळे सात देश या स्पर्धेत खेळणार नाहीत. अशा परिस्थितीत थॉमस आणि उबर कप स्पर्धा घेणे हे कितपत सुरक्षित आहे,’’ असे ट्विट सायनाने केले.
7 countries have withdrawn from tournament cause of the pandemic...Is it safe enough to conduct this tournament during this time ??... (Thomas and Uber Cup 2020) #coronavirus https://t.co/HC1qnueeLb
— Saina Nehwal (@NSaina) September 13, 2020
तत्पूर्वी, अनिवार्य क्वारंटाइन नियम आणि कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करणे कठीण होईल म्हणूनहैदराबादमध्ये भारतीय संघासाठी थॉमस आणि उबेर कपसाठी राष्ट्रीय तयारी शिबीर रद्द करण्यात आले होते. ओडेंसमधील डेन्मार्क ओपन 2020, एचएसबीसी बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर इव्हेंट, 13-18 ऑक्टोबर रोजी बीडब्ल्यूएफ टूर्नामेंट कॅलेंडरमध्ये मूळ योजनेनुसार आयोजित केले जाईल.