Wimbledon 2019: बारबोरा स्ट्राइकोवाचा दाणून पराभव करत सेरेना विलियम्स विंबलडनच्या फायनलमध्ये, आता लढत सिमोना हालेपशी
(Image Credit: Twitter/WTA)

माजी जागतिक नंबर 1 टेनिसपटू , अमेरिकेची प्रसिद्ध टेनिसपटू सेरेना विल्यम्स (Serena Williams) आणि रोमानियाची सिमोना हालेप (Simona Halep) यावर्षीच्या तिसर्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत खेळतील. एकीकडे सेरेनाने सेमीफायनलमध्ये चेक गणराज्य ची बारबोरा स्ट्राइकोवा (Barbora Strycova) हिला पराभूत केले तर हालेपने यूक्रेनच्या एलिना स्विटोलिना (Elina Svitolina) हिचा पराभव केला. सेरेनाने स्ट्राइकोवाला 6-1, 6-2 असे पराभूत केले. सेरेनाने 11व्या विंबलडन (Wimbledon) फायनलमध्ये पोहोचण्यासाठी 59 मिनिटांचा वेळ घेतला.

दुसरीकडे, हालेप पहिल्यांदा विंबलडनच्या फायनलमध्ये पोहचली आहे. हालेपच्या नावावर 1 ग्रँड स्लॅम जेते पद आहे जे तिने मागील वर्षी फ्रेंच ओपनमध्ये जिंकले. तर सेरेनाने 23 ग्रँड स्लॅम जेते पदं जिंकली आहे. शनिवारी होणाऱ्या फायनलमध्ये सेरेनाच्या नजर ह्या माजी टेनिसपटू मार्गारेट कोर्ट (Margret Court) हीच्या 24 ग्रँड स्लॅम रेकॉर्डची करण्यावर असणार आहे. हालेप विरुद्ध सेरेनाचा विजयाचा रेकॉर्ड 9-1 असा आहे. त्यामुळे या सामन्यात सर्वांची पसंती सेरेनाला असणार आहे.

दुसरीकडे, स्विटोलिनाचा पराभव करत फायनलमध्ये पोहचणारी हालेप पहिली रोमानियन महिला खेळाडू बनली आहे. हालेपचे हे पाचवे ग्रँड स्लॅम फायनल असणार आहे. हालेप 2014मध्ये विंबलडनच्या सेमीफायनलपर्यंत पोहचली होती मात्र, तेव्हा तिला युगेनी बुचर्ड (Eugenie Bouchard) कडून पराभवाला सामोरे जावे लागले.

आपला सामना जिंकल्यावर हालेप म्हणाली,"ही एक चांगली भावना आहे पण मी उत्साही आणि चिंताग्रस्त देखील आहे. हे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांपैकी एक आहे."