धावपटू पालेंदरची नेहरु स्टेडियमध्येच आत्महत्या
पालेंदर चौधरी ( फोटो सौजन्य -फेसबुक )

युवा आशियाई चॅम्पियनशिपचा मान पटकावलेला धावपटू पालेंदर चौधरी याने जवाहरलाल नेहरु स्टेटियमध्ये मंगळवारी आत्महत्ता केल्याने खळबळ उडाली आहे. तर या घटनेची भारतीय क्रिडा प्राधिकरणाने कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

धावपटू पालेंदरच्या आत्महत्येनंतर त्याला तातडीने सफदरगंज रुग्णालयात उपाचारासाठी हलविण्यात आले. मात्र त्याचा ब्रेन डेड झाल्याचे सांगितले गेले. या घटनेमुळे सर्वांना धक्का बसला असून साईच्या संचालक नीलम कपूर यांनी असे सांगितले की, ही घटना आमच्या येथील स्टेडियम नजीक झाली असल्याने विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.' तर या प्रकरणाचा अहवाल येत्या आठवडाभरात सादर करुन पालेंदरजवळ आत्महत्येचा कोणताही पुरावा मिळाला नसल्याचे ही सांगितले जात आहे.

2017 रोजी युवा आशियाई चॅम्पियनशिपमध्ये चौधरीने रिलेचे सुवर्ण पदाचा मान पटकावला होता. तसेच पालेंदर युवा विश्व चॅम्पियनशिपमध्येही त्याने सहभाग घेतला होता.