Rafael Nadal | File Photo | (Photo Credits- IANS)

स्पेनचा दिग्गत टेनिसपटू राफेल नदाल (Rafael Nadal) याने अमेरिकेन ओपन (US Open) स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. सेमीफायनल सामन्यात त्याने इटलीच्या मॅटिओ बेर्रेतिनीचा (Matteo Berrettini) 3 गेममध्ये पराभव केला. नदालने आपल्या 19 वर्षांच्या कारकीर्दीत पाचव्या वेळी यूएस ओपनच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यात त्यांचा सामना रशियाच्या डॅनिल मेदवेदेव (Daniil Medvedev) याच्याशी होईल. 23 वर्षीय मेदवेदेव कारकिर्दीतील प्रथमच ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. 24 व्या मानांकित इटलीच्या मॅटिओ बेरेटीनीचा 7-6 (8-6), 6-4, 6-1 असा सरळ सेटमध्ये पराभूत करून नदालने अंतिम फेरी गाठली. आर्थर ऐश स्टेडियमवर पहिले दोन सेट जिंकण्यासाठी नदालला कठोर संघर्ष करावा लागला. पहिला सेट टायब्रेकरमध्ये गेला जिथे नदालने 8-6 असा विजय मिळविला. दुसर्‍या सेटमध्येही बेराटिनीने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण नदालने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर त्याला हे करू दिले नाही.

33 वर्षीय राफेल नदालच्या अंतिम फेरीतील खेळाडूने आपल्या कारकीर्दीत आतापर्यंत 18 ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकले आहेत. रॉजर फेडररने पुरुष एकेरीत सर्वाधिक 20 ग्रॅडस्लॅम जेतेपद जिंकले आहेत. रविवारी नदाल अंतिम सामना जिंकल्यास त्याचे नावावर 19 ग्रँड स्लॅम होतील आणि असे झाल्यास पुढच्या वर्षी त्यांच्याकडे फेडररच्या विक्रमी 20 ग्रँड स्लॅम जेतेपदांची बरोबरी करण्याची संधी असेल. दुसर्‍या मानांकित नदालने सेमीफायनल सामन्यात सर्वोत्कृष्ट फॉर्म दाखविला, जो संपूर्ण स्पर्धेमध्ये दिसून येत आहे. या स्पर्धेत नदालने आतापर्यंत फक्त एकच सेट गमावला आहे. चौथ्या फेरीत नदालला मारिन सिलीच विरूद्ध सेट गमावला. तत्पूर्वी, पाचव्या मानांकित डेनिल मेदवेदेवने बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. रशियाच्या मेदवेदेवने सरळ सेटमध्ये विजय मिळविला. त्याने दिमित्रोव्हचा 7-6 (7-5), 6-4, 6-3 असा पराभव केला.

दरम्यान, आज होणाऱ्या महिले एकेरीच्या फायनल मॅचमध्ये कॅनडाच्या 19-वर्षाची बियन्का अँड्रेस्कूने (Bianca Andreescu) फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी कडक स्पर्धेत बेलिंडा बेंचिचला पराभूत केले असून. आज तिचा सामना अमेरिकेची महान खेळाडू सेरेना विल्यम्सशी (Serena Williams) होईल. अँड्रेस्कूने दोन सेटच्या रोमांचकारी सामन्यात स्वित्झर्लंडच्या बेंचिचला 7-6 (7-3), 7-5 ने पराभूत केले. 13 व्या मानांकित बेन्सिकने कॅनेडियन खेळाडूला दोन्ही सेटमध्ये कडवी झुंज दिली. अँड्रॅस्कू प्रथमच या स्पर्धेत भाग घेत आहे आणि तिने प्रथमच ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.