रक्षाबंधन निमित्त पीव्ही सिंधूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्या शुभेच्छा, पुढील वर्षी शक्यतो 'हे'गिफ्ट देण्याचे दिले वचन (Watch Video)
नरेंद्र मोदी आणि पीव्ही सिंधू (Photo Credit: Getty)

भारताची स्टार शटलर पीव्ही सिंधूने रक्षाबंधनच्या खास दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या. आज देशभरामध्ये रक्षाबंधन (Raksha Bandhan)  म्हणजे राखी पौर्णिमेचा (Rakhi Pournima) सण साजरा केला जात आहे. या दिवसाचं औचित्य साधत भारताची 'फुलराणी' सिंधूने मोदींना शुभेच्छा दिल्या. सिंधूने सोशल मीडिया अकाउंट ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट केला. कोविड-19 संक्रमणामुळे सध्या जागतिक आणि आंतरराष्ट्रीय सर्किटमध्ये खेळांचे कमी प्रमाणात आयोजन केले जात असल्याने आणि भारतात हवाई प्रवासाही निर्बंध कायम आहेत. सिंधूने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती म्हणाली, "या शुभ दिवशी रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा, तुम्ही देशासाठी खूप काही केले याबद्दल मी आभारी आहे. या कोविड-19 मुळे आम्ही ऑलिम्पिक्स खेळू शकलो नाही परंतु पुढच्या वर्षी या वेळेपर्यंत, आम्ही आशा करतो की आम्ही तुम्हाला भेट म्हणून शक्य तितकी पदकं देऊ." (सचिन तेंडुलकर, गौतम गंभीरसह भारतीय खेळाडूंनी साजरा केला यंदाचा 'वेगळा' रक्षाबंधन; युवराज सिंह रमला जुन्या आठवणीत, पाहा Posts)

पीव्ही सिंधूचे ट्विट:

रक्षाबंधनाच्या दिवशी सिंधूने दिलेला भावपूर्ण संदेश सर्व खेळाडूंना नवीन ऊर्जा देणारा आहे. क्रीडा स्पर्धा आयोजित होत नसल्याने आणि लॉकडाऊनच्या कारणात्सव खेळाडूंना सराव करता येत नाही आहे. भारतात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असतानाही अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे, भारतीय खेळाडू अजूनही आपल्या घरात कैद आहेत. दुसरीकडे, अन्य भारतीय खेळाडूंनी देखील सोशल मीडिया अकाउंटद्वारे सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या, तर काहींनी या खास सणाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

श्रावण महिन्यातल्या पौर्णिमेचा दिवस महाराष्ट्रामध्ये नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन म्हणून साजरा केला जातो. यादिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याला ओवाळते. त्या बदल्यात भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.