Korea Open 2019: कोरिया ओपनच्या सेमीफायनलमध्ये पारुपल्ली कश्यप, उद्या No 1 केंटो मोमोटा शी होणार लढत
पी कश्यप (Photo Credit: Getty)

भारतीय बॅडमिंटनपटू परुपल्ली कश्यपने (Parupalli Kashyap) शुक्रवारी डेन्मार्कच्या जन ओ जोर्गेनसेनवर ( Jan O Jorgensen) सरळ गेममध्ये विजय मिळवत कोरिया ओपन (Korea Open) वर्ल्ड टूर सुपर 500 च्या पुरुष एकेरीच्या सेमीफायनल फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत कश्यपने डेन्मार्कच्या जान ओ जोर्गेन्सेनला 24-22, 21-8 ने पराभूत केले. 33 वर्षीय कश्यपने 37 मिनिटांत हा सामना जिंकला आणि सेमीफायनलमध्ये स्थान मिळवले. सेमीफायनलमध्ये कश्यपची लढत शनिवारी जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांक आणि दोन वेळच्या चॅम्पियन जपानच्या केंटो मोमोटा (Kento Momota) याच्याशी होणार आहे. या स्पर्धेत ती एकमेव भारतीय शिल्लक आहे. याआधी, पीव्ही सिंधू पहिल्याच फेरीत बाहेर झाली तर सायना नेहवाल आणि बी साई प्रणित यांनी दुखापतीमुळे माघार घेतली.

2014 राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता कश्यप आणिजोर्गेनसेनमधील हा सातवा सामना होता. सातपैकी कश्यपने पाच सामने जिंकले, तर दोनमध्येत्याला पराभवाचा सामना करावा लागला. कश्यपने यापूर्वी प्री क्वार्टर फायनलमध्ये मलेशियाच्या डॅरेन लिऊला तीन सामन्यात पराभूत केले होते. कश्यपने तो सामना 21-17 11-21 21-12  ने जिंकला.या हंगामातील कश्यपचा हा दुसरा सेमीफायनल सामना असणार आहे. यापूर्वी, त्याने इंडिया ओपन (India Open) सुपर स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

पहिल्या गेममध्ये दोघांनी सुरुवातीला सावध सुरुवात करत पहिले आठ गुण शेअर केले. त्यानंतर कश्यप 8-11 ने पिछाडीवर होता, पण ब्रेकनंतर त्याने गुण मिळवले आणि मग दोघांनीही 14-14, 18-18, 19-19 और 20-20 अशी बरोबरी साधली. त्यानंतर जोर्गेन्सेने 22-21 अशी आघाडी मिळवली, पण कश्यपने पुन्हा 22-22 अशी बरोबरी केली आणि नंतर दमदार खेळ करत 24-22 असा गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये कश्यपनेजोर्गेन्सेनेला कोणतीही संधी दिली नाही आणि ब्रेकपर्यंत तो 11-5 ने आघाडी मिळवली. यानंतर, त्याने 21-8 ने गेम जिंकत मॅच जिंकली आणि सेमीफायनलमध्ये स्थान पक्क केले.