Bajrang Punia (Photo Credit - Twitter)

स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया याला मोठा धक्का बसला आहे. पूनिया याला पॅरिस ऑलम्पिक क्वालिफायर्ससाठी आयोजित नॅशनल सलेक्शन ट्रायल्समध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. टोकियो ऑलम्पिक (2020) मध्ये बजरंगने कास्य पदक मिळवलं होतं, मात्र त्याला रोहित कुमारने 65 किलोग्रॅम फ्रीस्टाइल वजन गटाच्या सेमीफायनलमध्ये पराभूत केले आहे. तर टोकियो ऑलंम्पीकमध्ये रौप्य पदक विजेता रवि दहिया याला देखील परभवाचा सामना करावा लागला आहे. 57 किलोग्रॅम फ्रीस्टाइल वजनी गटात उदित याने त्याला 10-8च्या फरकाने पराभूत केलं आहे. (हेही वाचा - Mumbai Vs Vidarbha Ranji Trophy Final: मुंबईच्या खराब फलंदाजीवर सचिन तेंडूलकर नाराज, विदर्भच्या गोलंदाजांचे केले कौतूक)

ट्रायल्स जिंकणाऱ्या खेळाडूंना पॅरिस ऑलम्पीक क्वालीफायर्समध्ये मध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. म्हणजेच आता रवि दहिया आणि बजरंग पूनिया यांना पॅरिस ऑलम्पिक मध्ये खेळता येणार नाही. बजरंग पुनिया डब्लूएफआय (भारतीय कुस्ती महासंघ)चे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये सहभागी होता. बजरंगने काही दिवसांपूर्वी यूनायटेड वर्ल्ड रेसलिंग(UWW) ला पत्र लिहून डब्लूएफआय विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती.

टोकिओ ऑलम्पिक 2020 मध्ये बजरंगकडून गोल्ड मेडलची अपेक्षा करण्यात येत होती, मात्र तेथे भारताला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले होते. यंदा देखील बजरंग पुनिया आणि रवि दहियाकडून पॅरिस ऑलम्पिकमधून पदकाची अपेक्षा होती पंरतू त्यांना या स्पर्धेसाठी देखील पात्र न होता आल्याने त्यांच्या चाहत्यांची निराशा झाली आहे.