उद्योजक मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि राधिक मर्चंट यांच्या लग्नामुळे गेल्या काही दिवसांपासून अंबानी कुटुंब चर्चेत आहे. आता नीता अंबानी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांची आतंरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य म्हणून पुन्हा एकदा निवड झाली आहे. रिलायन्स फाऊंडेशनने समाजमाध्यमावर अधिकृतपणे तशी माहिती दिली आहे. सध्या जगभरात पॅरिसमधील ऑलिम्पिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर नीता अंबानी चर्चेत आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) सदस्य म्हणून पुन्हा एकदा निवड झाली आहे. (हेही वाचा - Olympic Games Paris 2024 Google Doodle: ऑलिंपिक्स ची आज पासून सुरूवात; Google ने साकारलं खास डूडल!)

पाहा पोस्ट -

नीता अंबानी यांची सर्वप्रथम 2016 साली रिओ येथील ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान आयओसीच्या सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर आता आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा या समितीच्या सदस्य होण्याचा सन्मान नीता अंबानी यांना मिळाला आहे. भारताकडून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य होण्यासाठी त्यांना सर्व 93 मतदारांनी पाठिंबा दिला.

नीता अंबानी या रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा आहेत. "आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर पुन्हा एकदा निवड झाल्यामुळे मला फार सन्मानित झाल्यासारखं वाटत आहे. राष्ट्रपती थॉमस बाक आणि आयओसीच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. या आनंदाच्या आणि अभिमानाच्या क्षणाला भारतीय नागरिकांसोबत शेअर करायचे आहे.