डोपिंग प्रकरणी दोषी सापडल्यास कुस्तीपटूसह प्रशिक्षकाला दोषी ठरवणार, कुस्ती खेळासाठी नवा नियम लागू
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-PTI)

डोपिंग प्रकरणी आता जर कुस्तीपटू सापडल्यास त्याच्यासह प्रशिक्षकालासुद्धा दोषी ठरवण्यात येणार असल्याचा नवी नियम कुस्तीच्या खेळात लागू करण्यात आला आहे. यापूर्वी डोपिंगमध्ये फक्त खेळाडूवर बंदी किंवा दंडाची कारवाई केली जायची. मात्र आता प्रशिक्षकावर सुद्धा कारवाई होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

कुस्ती महासंघाने हा निर्णय घेतला असून भारताच्या नावावर आंतरराष्ट्रीय स्तरावर डोपिंगमुळे ठपका बसल्याचे बोलले जात आहे. मात्र यापुढे जर एखादा खेळाडू राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना डोपिंगमध्ये सापडल्यास त्याच्यासह प्रशिक्षकावर कारवाई करण्यात येणार असल्याचे महासंघाने सांगितले आहे.(भारताची नेमबाज अपूर्वी चंडेला 10 मी. एअर रायफल स्पर्धेत जागतिक क्रमावरीत अव्वल)

यापूर्वी भारतीय कुस्तीपटू डोपिंगच्या प्रकारात आढळले आहेत. अशा खेळाडूंचे निलंबन ही करण्यात आले असल्याचे महासंघाने सांगितले आहे. मात्र आता प्रशिक्षकाने आपला खेळाडू काय सेवन करतो याकडे लक्ष देणे अत्यावश्यक असल्याचे म्हटले आहे. तसेच एखाद्या खेळाडूने प्रशिक्षकाचे ऐकत नसल्यास त्याची तक्रार महासंघाकडे करावी असे सुद्धा सांगण्यात आले आहे.