भारताची नेमबाज अपूर्वी चंडेला 10 मी. एअर रायफल स्पर्धेत जागतिक क्रमावरीत अव्वल
Apurvi Chandela (Photo Credits: IANS)

भारताची महिला नेमबाज अपूर्वी चंडेला (Apurvi Chandela) एअर रायफलच्या रँकिंगमध्ये जगात नंबर वन ठरली आहे. महिलांच्या १० मी. एअर रायफल स्पर्धेच्या क्रमवारीत अपूर्वीने अव्वल स्थान पटकावले आहे. या क्रमवारीच्या दुसऱ्या स्थानावरही भारताच्याच अंजुम मुद्रील आहे.

2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर मिश्र रायफल स्पर्धेत कांस्य पदक पटकवणाऱ्या अपूर्वीने आपल्या जगातील अव्वल स्थानाबद्दल प्रतिक्रीया देताना म्हटले की, "वर्ल्ड नंबर 1 ने माझ्या नेमबाजी करिअरमध्ये आज एक मैलाचा दगड गाठला आहे.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन (आयएसएसएफ) विश्वचषक 2019 मध्ये सुवर्ण जिंकण्यासाठी अपूर्वीने 252.9 च्या विश्वविक्रमाची नोंद केली होती आणि 2020 मध्ये टोकियो गेम्ससाठी ओलंपिक कोटा मिळविण्याच्या सहा भारतीय नेमबाजांपैकी ती एक आहे.