Neeraj Chopra (फोटो सौजन्य - फेसबुस)

Paris Olympics 2024: ऑलिम्पिक आणि विश्वविजेता भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) ने पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympics 2024) पूर्वी मोठा निर्णय घेतला आहे. नुकतेच पावो नूरमी गेम्स (Paavo Nurmi Games) मध्ये सुवर्णपदक जिंकणारा आणि पॅरिस गेम्समध्ये भारताची सर्वात मोठी पदकाची आशा असलेला नीरज रविवारी होणाऱ्या पॅरिस डायमंड लीग (Paris Diamond League) मध्ये सहभागी होणार नाही. रिपोर्टनुसार, मांडीच्या आतील स्नायूंमध्ये अस्वस्थतेमुळे नीरजने या खेळांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

नीरज चोप्राने गेल्या महिन्यात पावो नूरमी गेम्स जिंकण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केली होती. नीरजने ऑलिम्पिकपूर्वी झालेल्या या खेळांमध्ये 85.97 मीटरची सर्वोत्तम थ्रो करून प्रथम क्रमांक पटकावला आणि सुवर्णपदक जिंकण्यात यश मिळवले. या स्पर्धेत याआधी नीरज मागे पडला होता, मात्र तिसऱ्या प्रयत्नात त्याने शानदार पुनरागमन केले आणि आपली आघाडी शेवटपर्यंत राखण्यात यश मिळवले. (हेही वाचा -Neeraj Chopra याने Federation Cup 2024 मध्ये जिंकले Gold Medal)

नीरज चोप्राने म्हटलं आहे की, तो प्रशिक्षण आणि थ्रो करताना त्याचा ब्लॉकिंग पाय मजबूत करण्यासाठी काम करत आहे. त्याने एका स्पोर्ट्स चॅनलला सांगितले की, थ्रो करताना मला ब्लॉकिंग लेग मजबूत करावा लागतो. कारण त्याच वेळी मांडीवर ताण येतो. त्यावर आम्ही काम करत आहोत. मी आणखी काही स्पर्धा खेळू शकलो असतो आणि मला खेळायचे होते, परंतु मला असे वाटले की आरोग्य प्रथम आहे. (हेही वाचा - Neeraj Chopra: नीरज चोप्राने 85 मीटर पेक्षा जास्त अंतरावर भालाफेकत पुन्हा अव्वल स्थान पटकावले)

ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्यापूर्वी मला प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायचा होता. आता अनुभवाने मी योग्य निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. फिनलंडमधील कामगिरी चांगली होती पण अजून काम करण्याची गरज आहे, असंही नीरज चोप्राने यावेळी म्हटलं आहे.