Raj Thackeray | X

Raj Thackeray on D. Gukesh:  भारताचा युवा स्टार डी गुकेश (D Gukesh) बुद्धिबळ विश्वाचा नवा चॅम्पियन बनला आहे. सिंगापूर येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत गुकेशने चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून विजेतेपद पटकावले. यासह गुकेश बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला आहे. गुरुवारी, 12 डिसेंबर रोजी चॅम्पियनशिपच्या 14व्या आणि शेवटच्या फेरीत दोघांमध्ये चुरशीची स्पर्धेत त्यांने विजेतेपद पटकावले. या विजेतेपदाच्या कमाई नंतर वेगवेगळ्या क्षेत्रातून त्याच्यावर अभिनंदनांचा वर्षाव हा होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील त्याचे अभिनंदन केले आहे.  (हेही वाचा  -  D Gukesh Prize Money: 17 दिवसांत 11 कोटी... विश्वविजेत्याची वयाच्या 18 व्या वर्षी प्रचंड कमाई, नेटवर्थ 20 कोटींच्या पुढे)

“भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश याने आज शब्दशः इतिहास घडवला आहे. वयाच्या अठराव्या वर्षी जगज्जेता डिंग लिरेनला हरवत गुकेश विश्वविजेता ठरला आहे. डी गुकेश याचं, त्याच्या कुटुंबीयांचं आणि त्याचे प्रशिक्षक यांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनःपूर्वक अभिनंदन. कला, विज्ञान आणि खेळ यांचा अद्वितीय संगम असलेला बुद्धिबळाचा हा खेळ भारतात, महाराष्ट्रात वृद्धिंगत होऊ दे आणि जगजेत्यांची एक मोठी परंपरा हिंदुस्थानात निर्माण होऊ दे हीच इच्छा”, अशी पोस्ट करत राज ठाकरे यांनी डी गुकेशचे कौतुक केले.

पाहा पोस्ट -

दरम्यान जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप ही क्रीडा जगतात सर्वाधिक बक्षीस रक्कम असलेल्या चॅम्पियनशिपपैकी एक आहे. या चॅम्पियनशिपची बक्षीस रक्कम 2.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच अंदाजे 21 कोटी रुपये आहे.