Milkha Singh Passes Away: फ्लाइंग सिख मिल्खा सिंह यांचे निधन; विराट, सचिन समवेत धुरंधर खेळाडूंनी वाहिली श्रद्धांजली
फ्लाइंग सिख मिल्खा सिंह (Photo Credit: PTI)

Milkha Singh Passes Away: भारताचे महान माजी धावपटू आणि ‘फ्लाईंग सिख’ (Flysing Sikh) अशी ओळख असलेले मिल्खा सिंह (Milkha Singh) यांचं  वयाच्या 91व्या वर्षी शुक्रवारी रात्री निधन झालं. मिल्खा यांच्या कुटुंबीयांनी एक निवेदन जारी करून महान धावपटूंच्या मृत्यूची पुष्टी केली. मोहालीतील (Mohali) एका रुग्णालयात मिल्खा सिंह यांना दाखल करण्यात आले होते. करोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना बुधवारी जनरल आयसीयूत ठेवण्यात आले. अचानक ताप आल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. शिवाय त्यांच्या ऑक्सिजन पातळीतही घसरण झाली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिल्खा सिंह यांच्या निधनानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्यासमवेत क्रिकेट विश्वातील धुरंधर खेळाडूंनी श्रद्धांजली वाहिली आहे. (Milkha Singh Passes Away: जगप्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंह यांचे COVID-19 संसर्गामुळे निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

भारताचा माजी धडाकेबाज सलामीवर फलंदाज विरेंद्र सेहवागने ट्विट करुन श्रद्धांजली अर्पण केली. सेहवागने ट्विटमध्ये ते धैर्य आणि इच्छाशक्तीचे प्रतिक होते असे म्हटले आहे.

आपल्या निधनाने आज प्रत्येक भारतीयांच्या हृदयात एक रिकामेपणा राहिला आहे, परंतु आपण येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहाल, असं मास्टर-ब्लास्टर सचिन म्हणाला.

त्यांचा वारसा पिढ्यान्पिढ्या कायम राहील, व्हीव्हीस लक्ष्मणने लिहिले.

भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे हे मिल्खा सिंह यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला

शिखर धवन

विराट कोहली 

श्रेयस अय्यर

हार्दिक पांड्या

लक्षात घेण्यासारखे म्हणजे काही दिवसांपूर्वी मिल्खा यांची पत्नी आणि भारताच्या व्हॉलीबॉल संघाची माजी कर्णधार निर्मल कौर यांचे कोविड-19 मुळे निधन झाले होते. दरम्यान, मिल्खा यांचा जन्म 20 नोव्हेबर 1929 रोजी पाकिस्तानातील पंजाबमध्ये झाला. 1958 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील 200 आणि 400 मीटर प्रकारात त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय खेळाडू ठरले होते.