भारताच्या युवा नेमबाज मनु भाकर (Manu Bhaker) हिने आयएसएसएफ (ISSF) वर्ल्ड कपमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत 244.7 च्या स्कोरसह जुनिअर वर्ल्ड रेकॉर्ड मोडत सुवर्णपदक जिंकले आहे. शूटिंग विश्वचषकातील हे भारताचे पहिले सुवर्णपदक आहे. या स्पर्धेत भारताच्या यशस्विनी देसवाल हिने अंतिम फेरीत सहावे स्थान मिळविले. यापूर्वी, डोहामध्ये आयोजित आशियाई नेमबाजी स्पर्धेत 17 वर्षीय मनुने 10 मीटर एअर पिस्तूल गेममध्ये सुवर्णपदक जिंकले होते. दरम्यान, या विजयासह 17 वर्षीय मनू हिना सिद्धू (Heena Siddhu) हिच्यानंतर आयएसएसएफ विश्वचषक फायनलमध्ये सुवर्णपदक मिळविणारी दुसरी भारतीयही ठरली. मनुने यापूर्वीच टोकियो ऑलिम्पिक (Olympic)2020 साठीचा कोटा मिळविला आहे. दर्म्य, यापूर्वी मनू 25 मीटर पिस्तूल स्पर्धेच्या फायनलमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरली होती. नेमबाजी विश्वचषकातील 25 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम सामन्यात भारताच्या मनुसह राही सरनोबतही फायनलमध्ये स्थान मिळवू शकली नाही. मनुने प्रिसिशनमध्ये 292 आणि रॅपिड स्पर्धेत 291 स्कोर केला. मनूचे एकूण गन 583 होती. जर्मनीच्या डोरीन व्हेनेकॅम्प आणि ऑस्ट्रेलियाच्या एलेना गालिआबोविचचीही 583 गुण होते. परंतु जर्मन नेमबाजांनी अधिक इनर 10 मारल्यामुळे अंतिम फेरी गाठली.
दुसरीकडे, आशियाई खेळात सुवर्णपदक जिंकणाऱ्या राहीची कामगिरीनिराशाजनक होती. पात्रता फेरीत ती 569 गुणांसह अंतिम स्थानी राहिली. पुरुष गटात अनिश भानवाल ने 578 च्या गुणांसह 20 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात दहावा क्रमांक मिळविला.
ऑलिम्पिकविषयी बोलताना, सध्या सुरू असलेली स्पर्धा ही मेगा स्पर्धेची पात्रता स्पर्धा असून भारतीय खेळाडू शक्य तितकी पदकं जिंकून जितकी जास्तीत जास्त पात्रता मिळवण्याचा प्रयत्न करतील. तत्पूर्वी, सौरभ चौधरी यानेही 10 मीटर पिस्तूल प्रकारात 245 गुण मिळवत सुवर्ण पदक जिंकले आहे. 50 मीटर रायफल स्पर्धेत संजीव राजपूत याने 262 गुणांसह रौप्यपदक मिळवले.